Take a fresh look at your lifestyle.

विकास दुबे यांच्या चकमकीवर तापसी पन्नूची प्रतिक्रिया, म्हणाली अशी अपेक्षा नव्हती

मुंबई | उत्तर प्रदेशच्या कानपूर पोलिस हत्येप्रकरणी most wanted विकास दुबे शुक्रवारी सकाळी पोलीस चकमकीत मारला गेला. आता नाट्यमय चकमकीबाबत सतत प्रश्न उपस्थित होत आहेत. आता या संपूर्ण घटनेवर बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने एक ट्वीट केलं आहे. हे अपेक्षित नव्हते असं तापसीनं म्हटलं आहे.

तापसी पन्नू यांनी लिहिले, “वाह! याची मुळीच अपेक्षा नव्हती !! आणि मग लोक म्हणतात की बॉलिवूडच्या कहाण्या सत्यापासून खूप दूर आहेत. ”तापसी पन्नूच्या या ट्वीटवर चाहतेही सतत प्रतिक्रिया देत असतात. काही चाहते तापसीच्या ट्विटच्या समर्थनार्थ ट्विट करत असताना काहीजण तिच्या विरोधात उभे असल्याचे दिसून येत आहे.

अशाप्रकारे विकास दुबे यांची हत्या झाली-

एसटीएफने विकास दुबेला सकाळी मध्य प्रदेशातील उज्जैनहून कानपूरला आणले. कानपूरला येताच पोलिसांची गाडी वाटेतच पलटी झाली. दरम्यान, विकास दुबे यांनी पोलिस कर्मचाऱ्याकडून शस्त्र घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे आणि पोलिस यांच्यात गोळीबार झाला. या दरम्यान विकास दुबे हे गंभीर जखमी झाले. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.