Take a fresh look at your lifestyle.

स्वतःच्याच ‘या’ नव्या ट्रेलरला ‘रिपोर्ट’ करण्याची तापसी करतेय मागणी !

‘थप्पड’च्या प्रमोशन साठी अगदी हटके प्रयोग !

पिच्चर अभी बाकी है । बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘थप्पड’ या चित्रपटाचा पहिला ट्रेलर रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. चित्रपटामध्ये, पतीने चपराक मारल्यानंतर घटस्फोटाची मागणी करणार्‍या एका स्त्रीची भूमिका तापसीने केली आहे. या ट्रेलरचे चांगले कौतुक होत असून मध्ये एका महिलेने या ट्रेलरमधून प्रेरणा घेतली असल्याची बातमी आम्ही तुम्हाला दिली होती.

  या गोष्टीला मोठं रूप देताना चळवळ बनवत चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झालाय. चित्रपटाच्या ज्या सीनमध्ये त्या बायकोला चपराक बसते तो सिन दाखवून जेव्हा चपराक बसते तिथून ट्रेलर थांबतो आणि पुढे तापसी आपल्याशी बोलू लागते. तिचे म्हणणे आहे, ही छोटी गोष्ट नाही, तुम्ही यातून बाहेर पडू शकता, मला मात्र लढावं लागेल.

  पुढे ती या ट्रेलर ला रिपोर्ट करा असाही सांगते. तिचे म्हणणे आहे कि असा अपमान सहनही करू नका आणि असा विडिओ इंटरनेटवर राहूही देऊ नका.

  अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. चित्रपटाच्या प्रमोशन साठी नवीन नवीन क्लुप्त्या घेऊन हि क्रिएटिव्ह लोकं येत असतात. तापसीच्या बोलण्यात पॉईंट असला तरी येत्या आठवड्यातच कळेल कि लोक या ट्रेलरला कसा रिस्पॉन्स देतात.

https://youtu.be/bkxmMeDIJlE