Take a fresh look at your lifestyle.

शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेचा थरार आता प्रेक्षक अनुभवणार; ‘शिवप्रताप गरूडझेप’चा टिझर रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| आपल्या महाराष्ट्राला दिग्गजांची भूमी म्हणतात. याचे कारण म्हणजे आपल्याला ऐतिहासिक वारसा आहे. धगधगत्या अग्निकुंडासारख्या गाथांची घडण आपल्या महाराष्ट्रातच झाली. यांपैकी संत, त्यांच्या गाथा आणि शिवरायांचे प्रताप मुलांवर संस्कार करीत असतात. गेल्या काही काळापासून अनेक निर्माते आणि दिग्दर्शक इतिहासाचे सुवर्ण पान हळूहळू उलघडत आहेत. यानंतर आता रक्तपात न करता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या मुघल सत्तेचा पहारा भेदून शिवरायांची आग्र्याहून सुटका कशी झाली..? हे सांगणारा चित्रपट येतोय. अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ याचा टिझर प्रदर्शित झाला आहे.

अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी आतापर्यंत शिवछत्रपती आणि स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकांमधून जगभरात लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे अर्थात संभाजी यांच्या भूमिका कोल्हेंनी जबाबदारी प्रमाणे वठविल्या. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे संभाजी महाराज यांचे नाव घेताच डोळ्यासमोर डॉ. अमोल कोल्हे यांचाच चेहरा उभा राहतो. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा ‘शिवप्रताप’ मालिकेतील हा ‘गरुडझेप’ चित्रपट कोल्हे स्वतःच घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. तूर्तास चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. या टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

गरुडझेप हा चित्रपट एक नवे इतिहासाचे पान उलगडणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एक नवा थरार अनुभवायला तयार व्हा. जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत आणि डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित हा चित्रपट घेऊन येतोय आग्र्याहून सुटकेचा थरार. या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम यांनी केले आहे. या चित्रपटाची विशेष आणि लक्षवेधी बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा दिसून येणार आहेत. दर्जेदार गाणी, टोकदार संवाद आणि थरारक ॲक्शन घेऊन लवकरच हा चित्रपट येतोय.