Take a fresh look at your lifestyle.

साखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का!

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | कोरोना व्हायरसमुळं लॉकडाऊन लागू केल्यानंतर अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. काही कार्यक्रमांच्या तारखा बदलण्यात आल्या. पण, आता मात्र देशातील बहुतांश भागांमध्ये अनलॉकचे विविध टप्पे सुरु झाले असल्यामुळे काही निर्बंध शिथील करण्यात येत असल्याचं दिसत आहे. परिणामी, आता काही कौटुंबीक कार्यक्रम आणि सोहळ्यांचीही आता काही प्रमाणात रेलचेल पाहायला मिळत आहे. अशातच आता एका लोकप्रिय अभिनेत्यानं त्याच्या प्रेयसीसह साखरपुडा केला

दाक्षिणात्य कलाविश्वात आपली ओळक प्रस्थापित करणारा हा अभिनेता आहे नितीन. त्यानं एक सोशल मीडिया पोस्ट करत आपल्या साखरपुडा सोहळ्यादरम्यानच्या फोटोसह चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली

शालिनीसह एक सुरेख फोटो त्यानं पोस्ट केल्याचं पाहत चाहत्यांनीही कमेंट बॉक्समध्ये या जोडीला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. नितीन आणि शालिनी येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच २६ जुलै २०२० ला विवाहबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळं चाहत्यांसाठी नक्कीच ही आणखी एक आनंदाची बाब असेल.

Comments are closed.