Take a fresh look at your lifestyle.

या अभिनेत्रीने करोडो रुपयांच्या किसींग सीन्सच्या ऑफर्स नाकारल्या, तरी जिंकली राष्ट्रीय पुरस्कार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन | चित्रपटातील किसींग सीन्स आजजघडीला फार मोठी गोष्ट नाही. एकेकाळी  किसींग सीन देण्यास कलाकार धजावत नसत. पण आता मात्र अगदी खुल्लमखुल्ला किसींग सीन्स दिले जातात. असे सीन्स देताना आजचे कलाकार जराही मागेपुढे पाहत नाही. अर्थात आजही काही मोजके कलाकार असे सीन्स देण्यास स्पष्ट नकार देतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे किर्ती सुरेश.

किर्ती सुरेशने आत्तापर्यंत एकाही सिनेमात किसींग सीन दिलेला नाही. अशा सीन्सच्या करोडो रूपयांच्या ऑफर्स तिलाही येतात. पण अशा अनेक ऑफर्स आल्या आणि किर्तीने त्या धुडकावून लावल्या. किर्ती सुरेश ही साऊथ इंडस्ट्रीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. आत्तापर्यंत अनेक हिट सिनेमांमध्ये तिने काम केले. एवढेच नाही तर उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला.

2000 साली प्रदर्शित झालेल्या पायलट्स या सिनेमातून किर्तीने तिच्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. 2013 साली ‘गीतांजली’ या मल्याळम सिनेमात ती पहिल्यांदा मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली. यावेळी किर्ती कॉलेजमध्ये शिकत होती. अभ्यास सांभाळत किर्तीने हा चित्रपट पूर्ण केला होता. यानंतर अनेक तामिळ, तेलगू, मल्याळम सिनेमात ती झळकली. पण यापैकी कुठल्याही सिनेमात तिने किसींग सीन दिला नाही. आजपर्यंत नो किसींग सीन ही पॉलिसी तिने पाळलीय. तिच्या सोबतीच्या अनेक अभिनेत्री असे सीन्स देताना एकदाही विचार करत नाहीत. पण किर्ती याला अपवाद ठरली. दमदार अभिनय आणि स्वत:वरचा विश्वास याचमुळे आजही ती टिकून आहे.

Comments are closed.