Take a fresh look at your lifestyle.

Boycott करा रे..! प्रेक्षकांनी घेतलाय लाल सिंग चड्ढा न पाहण्याचा प्रण; जाणून घ्या कारण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान याचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ आता लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान दिसतेय. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. वाटलं होत कि या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव होईल. पण इथे उलटच झालं. प्रेक्षकांनी तर हा ट्रेलर पाहताच चित्रपट बॉयकॉट करायचा असं ठरवलं आहे. इतकंच काय तर लोक या ट्रेलरनंतर आमिर आणि करीनाला चांगलाच ट्रोल करताना दिसत आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे. यातील आमिर आणि करीनाच्या चाहत्यांनी तर कौतुक केले पण बाकी नेटकऱ्यांनी ट्रोलिंगची संधी काही सोडली नाही. पण याचे कारण तरी काय..? हेच आपण जाणून घेऊ.

आमिर खान हा २०१८ सालानंतर थेट २०२२ मध्ये रुपेरी पडद्यावर दिसतोय. तर करीनासुद्धा मोट्ठ्या ब्रेकनंतर परततेय. त्यामुळे हा चित्रपट सुपरहिट होईल अशी चर्चा होती. पण प्रेक्षकांची नाराजी पाहता चित्रपट चालेल कि पडेल असा प्रश्न निर्माण झालाय. याचे कारण म्हणजे, आमिरचा हा चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे.

एकतर यामुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय याआधी आमिर खान आणि करीना कपूर खान यांनी काही वादग्रस्त विधानं केली होती. ज्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलंय. विशेष म्हणजे याप्रकरणी #boycottlalsinghchaddha हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होताना दिसतो आहे.

एका युजरने ट्विटरच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये लिहिलंय कि, “एकीकडे आमिर म्हणतो देश असहिष्णू झाला आहे आणि मी भारत सोडू इच्छितो. तर मग याच चित्रपट बॉयकॉट करा” याशिवाय आणखी एका युजरने ट्विटमध्ये लिहिलं आहे कि, “करीना कपूर स्वतः बोलते मी माझे चित्रपट पाहात नाही. मग आता तुम्ही देखील हा चित्रपट पाहण्यासाठी जाऊ नका.” याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी अनेक प्रकारचे मीम्स देखील शेअर केले आहेत. इतकेच नव्हे तर अनेक नेटकरी आमिरसह करीनावर त्यांनी केलेल्या विधानांसाठी राग व्यक्त करताना दिसत आहेत.