अर्जुन- मलायकाच्या नात्यावर पुन्हा उठले प्रश्न; मुलाखतीदरम्यान दिले चाहत्यांना उत्तर
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा हे एक असं कपल आहे ज्यांच्या बाबत सातत्याने विविध प्रश्न समोर येत असतात. कधी त्यांच्या वयातील अंतरावरून कधी त्यांच्या लुक्सवरून तर कधी त्यांच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीवरून. हे कपल सतत ह्या ना त्या कारणाने चांगलेच चर्चेत असते. मलायका आणि अर्जुन गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र तरीही अर्जुन कधीचं या नात्याबद्दल माध्यमांसमोर बोलत नाही. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुनने याचं कारण स्पष्ट केले आहे.
बी टाउनमध्ये अर्जुन आणि मलायका हे अत्यंत चर्चेत असणारे असे एक कपल आहे. बहुतेकदा याचे कारण त्यांचे वय असते. मात्र हे वय त्यांच्या प्रेमाआड कधीच येत नाही. मात्र तरीही अर्जुन याबाबत बोलणे पसंत करीत नाही. नुकताच कॅम्पेनियन या युटयूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने याबद्दल खुलासा केला आहे. यावेळी त्याला त्याच्या खाजगी आयुष्याबाबत प्रश्न करण्यात आले होते. यावर उत्तर देताना तो म्हणाला, ‘मला माझ्या खाजगी आयुष्याबद्दल जास्त बोलायचं नसतं. त्याच्या पाठीमागे तसेच कारण देखील आहेत. मी माझ्या जोडीदाराचा आदर करतो. तिच्या भावना लक्षात घेतो.
कारण तिच्या पाठीमागे एक भूतकाळ आहे. माझ्या बालपणी मी या परिस्थितीतून गेलोय. त्यामुळे मी समजू शकतो की हे सर्व कश्या पद्धतीचं असत आणि याचा विशेष करून मुलांवर काय परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काही गोष्टी खाजगी ठेवाव्या लागतात. मी माझ्या जोडीदाराविषयी पूर्ण आदर बाळगतो. मी तेच करतो ज्यात तिची सहमती असते. माझं पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य एकमेकांवर अजिबात अवलंबून नाही. असा खुलासा अभिनेता अर्जुन कपूर याने केला आहे. मालयकाच्या भूतकाळाविषयी बोलायचं झालं तर तिने अभिनेता आणि दिग्दर्शक अरबाज खानसोबत लग्न केले होते. मात्र २०१७साली ते कायद्याने विभक्त झाले. त्या दोघांना एक मुलगा देखील आहे. यानंतर सध्या मलायका अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ज्यामुळे दोघेही चांगलेच चर्चेत असतात.