Take a fresh look at your lifestyle.

इंस्टाग्रामवरचे टॉप १० भारतीय सेलेब्रिटी !

0

टीम, हॅलो बाॅलिवुड | आजच्या घडीला सेलिब्रिटीजची पॉपुल्यारिटी मोजायचे साधे सोपे साधन आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स. आज प्रत्येक तरुणापासून जेष्ठापर्यंत ज्याच्याकडे स्मार्ट फोन आहे, तो सोशल मीडिया वापरत आहे. यूजर्सची करोडोतली संख्या बघून जगातल्या मोठमोठ्या सेलिब्रिटीजनी या प्लॅटफॉर्म्सवर अकाऊंट्स काढले. त्यांच्या व्यावसायिक आणि खास करून वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी जाणून घ्यायला चाहते आधीपासूनच उत्सुक होते, त्या हिशोबाने त्यांना करोडोंच्या संख्येने फॉलोवर्स मिळाले. आपल्या ओळखीचा ‘इंस्टाग्राम’ हा यापैकीच एक पॉप्युलर सोशल प्लॅटफॉर्म आहे जिथे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करून माहिती आणि संवाद साधला जातो.

सर्वात जास्त फॉलोवर्स असलेल्या अकाउंट्सपैकी ९० टक्के, हे फिल्म आणि मनोरंजन क्षेत्रातले कलाकार आहेत. त्यातही ७० टक्के वाटा हा स्त्री कलाकारांचा आहे हे काही विशेष सांगायची गरज नाही. इंस्टाग्रामचे ऑफिशिअल अकाउंट सोडले तर ख्रिस्तियानो रोनाल्डो या पोर्तुगाली फुटबॉल खेळाडूचे सर्वात जास्त तर त्यानंतर अरियाना ग्रँडे या अमेरिकन गायक आणि अभिनेत्रीचे फॉलोवर्स आहेत.
सध्या भारतीय कलाकारांनीही इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म्सवर मोठी मजल मारली आहे. त्यांचेही फॉलोवर्स मिलियन्स मध्ये आहेत. आश्चर्य म्हणजे त्यात एकही खान,कपूर किंवा बच्चन नाहीये. हे आकडे बदलत्या बॉलिवूड आणि स्टारडमच चित्र स्पष्ट करतात.

पहा व्हिडीओ-

Leave a Reply

%d bloggers like this: