Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्र्याचा पोरगा म्हणुन जेनेलिया रितेशला इग्नोर करत होती पण..

फिल्मी दुनिया | रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची जोडी आख्ख्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी जोडी आहे. पण आपल्या या मराठमोळ्या रितेशला साऊथ इंडियन जेनी नक्की कशी भेटली? काय आहे जेनी – रितेश ची लव्हस्टोरी?

तर त्याचं झालं असं की ३ जानेवारी २००३ साली ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटातून रितेशने आपल्या करिअरची सुरवात केली. जेनेलिया डिसुजा हि या चित्रपटात लीड आभिनेत्री होती. रितेशची हि फिल्म फ्लोप गेली पण तुझे मेरी कसम चित्रपटाने रितेशला जेनेलिया दिली. रितेशच्या बाबतीत त्याच्या करीअर आणि चित्रपटांपेक्षा त्याच्या लव्हस्टोरीवर अधिक चर्चा होते. कारण ब्रेकअप च्या या दुनियेत रितेश आणि जेनेलिया खर्‍या प्रेमाची एक मिसाल आहेत.रितेशने करिअरमध्ये भले अनेक हेलकावे घेतले असतील मात्र तो स्वतःच्या पर्सनल लाइफ मध्ये कायम यशस्वी राहिला आहे. २००२ साली रितेश आणि जेनेलिया तुझे मेरी कसम चित्रपटाच्या निमित्ताने भेटले होते. दोघांची पहिली भेट हैद्राबाद विमानतळावर झाली होती. रितेशचे वडील विलासराव देशमुख हे त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे पहिल्या मुलाखतीवेळी रितेश सुद्धा नेताच होणार असं जेनेलियाला वाटलं होतं. पहिल्या भेटीत जेनेलिया रितेशला इग्नोर करत होती. मात्र जेव्हा ती रितेशच्या घरच्यांना भेटली आणि त्यांच्या मनातील तिच्याविषयीचा सन्मान तिने पाहिला तेव्हा ती चांगलीच प्रभावित झाली.

दरम्यान चित्रपटाच्या शुटींग मध्ये सेटवर असताना रितेश आणि जेनेलीया यांच्यातील मैत्री वाढली. तेव्हा रितेश २४ वर्षांचा होता तर जेनेलिया फक्त १६ वर्षांची. रितेश जेनेलियाला आर्कीटेक्चर बद्दल सांगायचा तर जेनी त्याला आपल्या आभ्यासाबद्दल सांगायची. चित्रपटाचं शुटींग संपल्यानंतर दोघ आपापल्या घरी परतले मात्र दोघही एकमेकांना मिस करत होते. त्यांची हि लव्हस्टोरी खूपच काळ चालू होती. मात्र यातलं काहीच मीडियात येणार नाही याची खबरदारी दोघांनीही घेतली होती.पुढे दोघांनी मस्ती चित्रपटात एकत्र काम केलं. रितेशने क्या कुल है हम, अपना सपना मनी मनी, माला माल विकली य चित्रपटांसाठीही काम केले. मधील काळात जेनी आणि रितेश यांच्यातला नात फुलतच गेल. त्यांच्या प्रेमाला चांगली बहर आली. आणि अखेर ३ फेब्रुवारी २०१२ रोजी रितेश आणि जेनेलिया यांनी विवाह केला. तुम्हाला हे वाचून धक्का बसेल कि लग्नाअगोदर दोघंही एकमेकांना दहा वर्ष डेट करत होते. मिडीयाला मात्र याचा काहीही पत्ता नव्हता. लग्नानंतर लगेचच ‘तेरे नळ लव्ह हो गया’ चित्रपट प्रदर्शित झालं. प्रेक्षकांनी रितेश आणि जेनेलियाच्या जोडीला भरभरून दाद दिली.

Comments are closed.