Take a fresh look at your lifestyle.

बिग बॉस १३ विजेता सिद्धार्थ शुक्लाने पोस्ट केला मिरर सेल्फी चाहते म्हणाले,

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बिग बॉस १३ जिंकणारा सिद्धार्थ शुक्ला आता जिमच्या रूटीनमध्ये परतला आहे आणि आपल्या बॉडी बिल्डिंगवर लक्ष केंद्रित करत आहे. त्याचा परिणामही दिसून येतोय, आज सकाळी सिद्धार्थ शुक्ला याने एक छायाचित्र शेअर केले. सिद्धार्थच्या आरशासमोर उभे असलेल्या या छायाचित्रात सिद्धार्थने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- स्वत:शीच स्पर्धा … शुभेच्छा.

सिद्धार्थ शुक्लाचे हे छायाचित्र पाहून एका चाहत्याने सांगितले- तू शेर है तू अकेला हि काफी है..

बिग बॉसच्या घरातून परतल्यानंतर सिद्धार्थ शुक्लाची ही पहिली सोशल मीडिया पोस्ट आहे, त्यामुळे चाहते खूप खुश आहेत. एका चाहत्याने लिहिले – केवळ सिड मॅटर करतो

बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची केमिस्ट्री खूप पसंत करण्यात आली होती. या दोघांच्या जोडीला लोक सिडनाज म्हणतात. अलीकडेच सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल एकत्र दिसले. सिद्धार्थसोबत शहनाजने एक छायाचित्र शेअर केले. या छायाचित्राला १४ तासांत १ दशलक्षाहून अधिक पसंती मिळाल्या.

‘सिड नाज ब्रोकेन इंटरनेट’ हा हॅशटॅग देखील ट्विटरवर ट्रेंडिंग होतोय.

 

Comments are closed.