Take a fresh look at your lifestyle.

मुलानंतर आता थप्पड़ मारणाऱ्या मुलीला नेहा धुपियाने फटकारले

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । शोमध्ये नेहा धुपियाच्या ग्रुपमध्ये असलेला रोडीज एक्सट्रीम विजेता काशिश ठाकूर पुंडीर. त्याने नेहाला पाठिंबा देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये नेहा इराम खान नावाची एक महिला स्पर्धकावर रागवताना दिसत आहे. खरं तर, इरामने काशिशला चापट मारली होती, त्यानंतर नेहा धुपियाने काशिशला पाठिंबा देताना इरामला फैलावर घेतलं.

क्लिपमध्ये नेहा धुपिया असे म्हणताना दिसत आहे की तुम्हाला कोणावर हात उचलण्याचा अधिकार नाही.काही जरी झाले तरी हात उगारु नका. येथे इराम तिच्याकडे दिलगिरी व्यक्त करताना दिसला पण नेहा मात्र त्याचे ऐकत नाही. ती पुढे म्हणते की आपण स्त्री असो की पुरुष, दुसर्‍यावर हात उगारण्याचा कोणालाहीही अधिकार नाही. मग जे काही घडेल. मुलावर हात उचलणे म्हणजे महिला सबलीकरण नाही. आपण मुलावर हात उचलू शकत नाही कारण तो तुम्हाला पालटून मारू शकत नाही.


View this post on Instagram

 

just watch before throwing up any comment… thanks…🙏🙏 . . @nehadhupia @mtvroadies #nehadhupia

A post shared by THAKUR KASHISH PUNDIR (@kashishthakur_official) on Mar 14, 2020 at 6:12am PDT

 

काही दिवसांपूर्वी नेहा धुपियाला तिच्या रोडीज रेव्होल्यूशनचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर जोरदार टीकेला सामना करावा लागला होता. व्हिडिओमध्ये नेहा धुपियाने तिच्या शोमधील एका स्पर्धका वर रंगवताना शिवीगाळ केली. ही क्लिप इंटरनेटवर व्हायरल झाली आणि लोकांनी नेहा धुपियावर जोरदार टीका केली. यासह अनेक मेम पेजेस वर नेहा धुपिया ट्रोल झाली.

शोमध्ये एक स्पर्धक होता ज्याने सांगितले की त्याने एका मुलीला चापट मारली कारण तिच्याकडे आणखी ५ बॉयफ्रेंड आहेत. आणि ती सतत माझी फसवणूक करत होती. स्पर्धकाने पुढे सांगितले होते की त्याने आपल्या गर्लफ्रेंडला तसेच त्याच्या पाचही बॉयफ्रेंडना कॉल केले. यानंतर त्याने या सर्वांच्या समोर आपल्या गर्लफ्रेंडला चापट मारली. हे ऐकून नेहा चिडते आणि त्या प्रतिस्पर्ध्यावर रागावू लागते आणि एका किंवा अनेक मुलां बरोबर राहणे ही त्या मुलीची निवड असल्याचे म्हटले आहे. नेहाच्या या कमेंटमुळे तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले गेले.

 

त्यानंतर नेहाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका पोस्टद्वारे आपले मत व्यक्त केले. पोस्टमध्ये नेहा म्हणाली की कोणत्याही नात्यात कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे ती समर्थन करत नाही. नेहा धुपियाच्या त्या पोस्टनंतर काही लोकांनी तिला पाठिंबाही दिला.

 


View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on Mar 14, 2020 at 4:16am PDT

 

Comments are closed.

%d bloggers like this: