Take a fresh look at your lifestyle.

राखी सावंतने दाखवली ‘स्वयंवर’ची वास्तविकता म्हणाली,’त्यावेळी मिळाले होते कोट्यावधी रुपये’

हॅलो बॉलिवूड ऑनलाइन । राखी सावंत तिच्या वक्तव्यांवरून नेहमीच वादात असते, म्हणून तिला कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन असेही म्हटले जाते. यावेळीही राखी ने टीव्हीवर सध्याला प्रसारित होणाऱ्या स्वयंवर कार्यक्रमावर टीका केली आहे.सध्या बिग बॉस १३ ची स्पर्धक शहनाज गिल हीच टीव्ही रिऍलिटी शोमध्ये स्वयंवर चालू आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत राखीने अशा रिअ‍ॅलिटी शोची वास्तविकता सांगितली आहे.

स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत राखी सावंत म्हणाली, “स्वयंवर हा काही रिऍलिटी शो नाही.इथे कोणी लग्न करत नाही. माझंही लग्न झालं नाही आणि चांगली मुले लग्नासाठी टीव्हीवर येत नाहीत. मलाही लग्नासाठी चांगला मुलगा मिळाला नाही.राखी पुढे म्हणाली – मी लग्न केले नाही. तिथे फक्त सगाई होती आणि हे कार्यक्रम केवळ जगाला दर्शविण्यासाठी आहेत याच वास्तव काहीतरी वेगळे आहे. जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर तुम्ही लग्न करा, जर तुम्हाला ते आवडत नसेल तर लग्न करू नका. ही तुमची निवड आहे. चॅनेल आपल्याला लग्नासाठी सक्ती करत नाही.

राखी म्हणाली, जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर तुम्ही हा शो करू शकता. जेव्हा मी हा शो केला, तेव्हा मला आर्थिक मदत करणारे कोणी नव्हते. मला त्यातून चांगले पैसे मिळत होते. त्याचवेळी अभिषेकबरोबर ब्रेकअप झाला होता, त्यामुळे माझ्याकडे राहण्यासाठी घरही नव्हते. माझ्या वडिलांचे निधन झाले होते, माझ्या वर आई आणि भावालाची देखील जबाबदारी होती. मी काय करू शकते ? काही चुकीचे काम करण्यापेक्षा मी ते केले. त्याच्यातुन मिळालेल्या पैशामधून मी मुंबईत घर विकत घेतले.

काही दिवसांपूर्वीच शहनाज गिलच्या वडिलांनी असे म्हटले होते की सना जो कॅटरिना कैफसारखी आहे,चांगली प्रतिमा तयार करण्याऐवजी ती आपली राखी सावंत सारखी प्रतिमा बनवित आहे. राखीने शहनाजचे वडील संतोख सिंग यांनाही प्रत्युत्तर दिले होते. राखी म्हणाली – तिचे नाव आदराने घ्या. त्यांची मुलगी कतरिना कैफ आहे असे समंजू नका.

शहनाज गिलला या रिऍलिटी शोसाठी दहा लाख रुपये मिळाले या विषयी बोलताना राखी म्हणाली की त्यावेळी तिला दीड कोटीपेक्षा जास्त फी मिळाली होती.

Comments are closed.