Take a fresh look at your lifestyle.

… जेव्हा ‘बागी ३’ च्या सेटवर श्रद्धाला संवाद बोलताना झाला त्रास

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । दिग्दर्शक अहमद खानने आपल्या आगामी ‘बागी ३’ चित्रपटाशी संबंधित अशीच एक घटना उघडकीस आणली आहे, जेव्हा चित्रपटाची अभिनेत्री श्रद्धा कपूरला तिचे संवाद बोलण्यात बरीच अडचण आली होती.

‘द कपिल शर्मा शो’ या सोनी टीव्हीच्या कार्यक्रमात चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेल्या घटनेचा संदर्भ देताना दिग्दर्शक म्हणाले की, “शूटिंगच्या पहिल्याच दिवशी श्रद्धा शिवीगाळ कशी करायची याचा सराव करत होती, कारण तिच्या पात्राची ती मागणी होती माझी पत्नी सेटवर होती आणि श्रद्धा काय विचित्र करत होती हे तिला समजले नाही. बराच वेळ सर्व केल्यानंतर तिने सांगितले की, ‘सर, मला हे बोलता येत नाहीये, मी योग्य ते म्हणत नाही आहे. “

 

त्यानंतर चित्रपटाचे लेखक फरहाद संभाजी तिच्या मदतीसाठी पुढे आले आणि त्यासाठी श्रद्धाला प्रशिक्षण दिले. ‘बागी ‘ चित्रपटाच्या या तिसर्‍या भागात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ६ मार्च रोजी प्रदर्शित होईल.

 

 

Comments are closed.

%d bloggers like this: