Take a fresh look at your lifestyle.

उर्वशी रौतेला हिच्या अदाने केले सर्वांना घायाळ, त्यानंतर अभिनेत्रीने असं काही केलं कि,- पहा व्हिडिओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । उर्वशी रौतेला चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असते. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ एका इव्हेंटचा आहे, जिथे फोटोग्राफरने उर्वशी रौतेलाचा एक फोटोत घेतला. यावेळी अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. उर्वशी रौतेलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

उर्वशी रौतेलाचा हा व्हिडिओ वुम्पलाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. चाहते तिच्या या व्हिडिओंवर कमेंट्सद्वारे प्रतिक्रिया देखील देत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये माहिती देण्यात आली आहे की हा व्हिडिओ संगीत पुरस्काराचा आहे. नुकतीच एक बातमी समोर आली आहे की उर्वशी रौतेला तिच्या एका इंस्टाग्राम पोस्टसाठी लाखो रुपये घेते आणि याबाबत ती सर्वात महागड्या अभिनेत्रीपैकी एक आहे. उर्वशी रौतेला दुबईची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर देखील आहे.

नुकतीच उर्वशी रौतेलाचे ‘एक डायमंड दा हार लेडे यार’ हे गाणे प्रसिद्ध झाले आहे. हे गाणे सोशल मीडियावरही चांगलेच पसंत केले जात आहे. यापूर्वी उर्वशी रौतेला पागलपंती चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात पुलकित सम्राट, अनिल कपूर, जॉन अब्राहम, इलियाना डिक्रूझ आणि कृती खरबंदा मुख्य भूमिकेत दिसले. उर्वशी रौतेला २०१४ मध्ये हनी सिंगच्या ‘लव डोस’ गाण्यात दिसली होती, ज्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

 

Comments are closed.