हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीचा लाडका अभिनेता वैभव तत्ववादी आणि ग्लॅमरस अभिनेत्री पूजा सावंत या दोघांची ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटातून प्रेक्षकांचे मन जिंकले होते. शिवाय चीटर या चित्रपटातही ते दोघे एकत्र दिसले होते. ही जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी म्हणून आता ओळखली जाऊ लागली आहे. शिवाय ते दोघे चांगले मित्र मैत्रीण देखील आहेत. गेल्या काही काळापासून त्यांच्या एकत्र येण्याची नुसती चर्चा रंगली होती. यानंतर आता एक मोठं सरप्राईज घेऊन ते दोघेही एकत्र आले आहेत. नुकताच त्यांचं पहिलं वहिलं हिंदी गाणं रिलीज झालं आहे.
या दोघांनी ‘चल अब वहाँ’ या आपल्या आगामी रोमँटिक हिंदी सॉंग अल्बमची घोषणा केली आहे. नुकताच या अल्बमचा प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. आता मराठी रुपेरी पडद्यावरची ही लोकप्रिय जोडी ‘चल अब वहाँ’ म्हणत ‘व्हिडीओ पॅलेस’सोबत काम करते आहे. आपल्या पहिल्याच हिंदी अल्बमसाठी ते दोघेही उत्सुक असल्याचे म्हणाले आहेत. ‘चल अब वहाँ’ मीठी जहाँ बोलिंया’ ! ‘चल अब जहाँ’ राते दिवाली हो, दिन हो होलिया’! असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात वैभव आणि पूजा यांची जोडी रोमँटिक अंदाजात आपल्या समोर येत आहे.
आपल्या या नव्या अल्बमबद्दल बोलताना दोघांनीही सांगितले कि, ‘काश्मीरमधील निसर्गरम्य ठिकाणी शूट करण्याचा आनंद तर होताच पण या गाण्याच्या निमित्ताने आम्हाला पुन्हा एकत्र काम करता आलं हे आमच्यासाठी जास्त ख़ास होतं. आम्ही हे गाणं खूप एन्जॉय केलं. प्रेक्षकही हे गाणं तितकच एन्जॉय करतील असा आम्हा विश्वास आहे. व्हिडीओ पॅलेस’ या नावाजलेल्या म्युझिक कंपनीच्या पहिल्या हिंदी अल्बममध्ये काम करायला मिळणं ही आमच्यासाठी अमूल्य भेट आहे. हे गाणं काश्मीरच्या निसर्गरम्य लोकेशन्सवर चित्रीत केलंय आणि याचे नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकरने केले आहे. तर विदुर आनंद यांनी गाणे लिहिले आहे आणि अब्दुल शेख यांनी संगीतबद्ध केले आहे. ‘व्हिडीओ पॅलेस’चे हिंदी निर्मितीतलं हे पदार्पण यशस्वी होईल असा विश्वास ‘व्हिडीओ पॅलेस’च्या नानूभाई जयसिंघानिया यांनी व्यक्त केलाय.
Discussion about this post