Take a fresh look at your lifestyle.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वरुण धवनचं वाघा बॉर्डरवर खास देशभक्तीपर गाणं !

टीम, हॅलो बॉलीवूड । प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वरुण धवनच्या स्ट्रीट डान्सर चित्रपटाच्या निमित्ताने एक खास गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ओरिजिनल संगीतकार शंकर एहसान लॉय असलेलया आपल्या सगळ्यांना माहिती असलेले ‘ सबसे आगे होंगे हिंदुस्थानी’ या गाण्याचं रिमेक करण्यात आला आहे.

    वन टेक मध्ये शूट झालेल्या या गाण्याला वाघा बॉर्डरवर खास चित्रित करण्यात आलं आहे. वरून धवन आणि टीमने एनेर्जीटीक असा डान्स वाघा बॉर्डरवर केला आहे. या देशभक्तीपर गाण्याला २६ जानेवारी प्रजासत्ताक दीना निमित्त रिलीज करण्यात आलं आहे.

   गाण्याला खूप कमी वेळात भरपूर व्ह्युव्हज मिळत आहेत.