Take a fresh look at your lifestyle.

वरुण धवन आणि रिचा चड्ढा यांच्या लग्नावर कोरोनाव्हायरसचे सावट,लग्नाची तारीख ढकलली पुढे

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा प्रभाव हळूहळू बॉलिवूड स्टार्सच्या आयुष्यावरही पाहायला मिळत आहे. वास्तविक, कोरोनाव्हायरसमुळे वरुण धवन आणि नताशा दलाल,रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यावर्षी उन्हाळात वरुण धवन आणि नताशा दलालचे लग्न होणार होते असे सांगितले जात आहे, पण आता हे लग्न नोव्हेंबरमध्ये होणार आहे. तर त्याचवेळी एप्रिल महिन्यात रिचा चड्ढा आणि अली फजल यांचे लग्न कोरोनाव्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आले आहे.


View this post on Instagram

 

☃️mountain ke dost @natashadalal88 @virat.kohli @anushkasharma

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on Dec 29, 2019 at 11:37am PST

 

वरुण धवन आणि नताशा दलालशी संबंधित त्यांच्या सूत्रांनी सांगितले की, “सध्याची परिस्थिती पाहता त्यांनी नोव्हेंबरपर्यंत लग्न तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लग्न थायलंड मध्ये करायची योजना आखली गेली आहे. ” सूत्रांनी सांगितले की, वरुण आणि नताशाचे लग्न थायलंडमध्ये होणार होते, पण त्यानंतर जोधपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्याचे ठरवले होते,त्याचबरोबर मुंबईत एका छोट्या सोहळ्यावरही विचार केला जात होता. मात्र, कोरोनाव्हायरसच्या बातमीनंतर वरुण धवन आणि नताशा दलाल नोव्हेंबरमध्ये थायलंडमध्ये लग्न करू शकतात.

 

 

रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाविषयी बोलताना दोघांनी एप्रिल महिन्यात लग्नाची तारीख निश्चित केली होती. परंतु एका सूत्रांने हा खुलासा केला की हे लग्न पुढे ढकलले गेले आहे कारण बरेच पाहुणे परदेशातून देखील येत आहेत. लग्न दिल्लीत होणार आहे, म्हणून कोरोनाव्हायरसमुळे ते आणखी पुढे ढकलण्यात आलं आहे. याविषयी स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “त्यांचे बरेच पाहुणे अमेरिका, युरोप आणि इतर अनेक ठिकाणांहून येत होते. जोडप्यांनी दिल्लीतच लग्न करण्याचा विचार केला होता. परंतु सध्याचे वातावरण पाहता त्यांनी पुढच्या च्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

 

Comments are closed.