Take a fresh look at your lifestyle.

विकी कौशलच्या ‘भूत’चा ट्रेलर रिलीज, पण लहान मुलांना अजिबात दाखवू नका !

पेहली नजर । विकी कौशल स्टारर भूत पार्ट वन द हॉन्टेड शिपचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये, एक नवीन गोष्ट दिसते ती म्हणजे, जी झपाटलेल्या घरे आणि वस्त्यांऐवजी झपाटलेल्या जहाजाची कथा दिसते. करण जोहरने आपल्या ट्विटर अकाउंटवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. 21 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

   भूत द हॉन्टेड शिपचा प्लॉट असा आहे कि, वाईट हवामानामुळे मुंबईच्या जुहू बीचवर आलेल्या एका जहाजाची असून या शिफची तपासणी केल्यावर असे आढळले की ते सी बर्ड नावाचे हे जहाज पछाडलेले आहे. विक्की कौशल एक सर्वेक्षण अधिकारी ‘पृथ्वी’ची भूमिका साकारत आहेत. जेव्हा त्यांच्यावर काही विचित्र घटना घडतात तेव्हा ते शिपची तपासणी करण्यासाठी जातात.

   ट्रेलर रिलीज होण्याच्या काही तास आधी विकीने एक फोटोही शेअर केला होता. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘बूगीमन पुन्हा गावी आला आहे आणि तो शांत राहू शकत नाही’. त्याचे उत्साह फोटो आणि कॅप्शनमध्ये स्पष्ट दिसत होते. करण जोहर हा या चित्रपटाचा निर्माता आहे.