Take a fresh look at your lifestyle.

वारीना हुसेनचे आमिर खानच्या पावलावर पाऊल; सोशल मीडियाला केला राम राम

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री वारीना हुसेन नेहमीच अश्या व्यक्तींपैकी एक राहिली आहे जे कधीतरी सोशल मीडियाचा वापर करतात. गेल्या वर्षी सोशल मीडियाला “सोशल मीडिया डिटॉक्स” म्हणून संबोधून तिने एक महिना सुट्टीही घेतली होती. मात्र नुकतीच तिने एक धक्कादायक घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी आमिर खानने सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याच्याच पाऊलावर पाऊल ठेवत वारीनाने सुद्धा सोशल मीडियाला टाटा बाय बाय केला आहे. इंस्टाग्रामवर वारीना हुसेनचे १.९ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. हे पाहता तिचे फॅन फॉलोव्हिंग जबरदस्त आहे यात काही वादच नाही.

आपल्या वाढदिवसाच्या एक दिवसानंतर सोशल मीडियाचा त्याग केल्यामुळे सुपरस्टार आमिर खान खूपच चर्चेत आला होता. आता वारीनाने त्याच्याच पावलावर पाऊल टाकले आहे. त्याचप्रमाणे तिने आता सोशल मीडियावर वैयक्तिकरित्या उपलब्ध नसेन अशी माहिती चाहत्यांना दिली आहे. आपल्या मुलाखतींमध्ये तिने नेहमीच नमूद केले आहे की, ती स्वत:ला सोशल मीडिया जाणकार मानत नाही.

गेल्या काही महिन्यांत, तिला साध्या बटन फोनसह पाहिले गेले आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांकडून प्रश्नांचा भडका उडाला होता. तिच्या नेहमीच्या दैनंदिन शैलीत, वारिना हुसेनने हि पोस्ट सामायिक केली आहे. या पोस्टमध्ये तिने आमिर खानचा उल्लेख देखील केला आहे. आमिर सरांच्या भाषेत ढोंग सोडत आहे, असे तिने म्हटले आहे.

वारीना हुसेनने सलमान खान प्रॉडक्शनमध्ये २०१८ साली “लव्हयात्री” या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर तिचा स्वतःचा चाहता वर्ग निर्माण झाला. चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. यानंतर ती सलमान खानसोबत “मुन्ना बदनाम हुआ” या खास गाण्यासाठी “दबंग ३” चित्रपटात दिसली होती. नुकतेच वारिनाने तिच्या “द इनकम्प्लिट मॅन” या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. तसेच ती लवकरच तेलगू सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. दोन अघोषित तेलुगू प्रकल्पांसह, दक्षिण राम आणि एनटीआर प्रॉडक्शन यांच्या चित्रपटात वारीना दिसणार आहे.