हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून अत्यंत गाजलेले प्रकरण म्हणजे अभिनेते किरण माने यांची मालिकेतून केलेली हकालपट्टी. स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील नामक भूमिका माने साकारत होते. त्यांच्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता असतानाही त्यांना मालिकेतून थेट बाहेरचा रास्ता दाखविण्यात आला. दरम्यान त्यांना कोणतेही कारण वा नोटीस न देता हि कारवाई करण्यात आल्यामुळे हे प्रकरण चांगलेच पेटले आहे. दरम्यान आपण राजकीय भूमिका घेत असल्यामुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकल्याने माने यांनी सांगितले होते. यानंतर सेटवरील महिला सहकलाकारांनी माध्यमांना त्यांच्या गैरवर्तवणुकीबद्दल सांगितल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संदर्भात अमेय खोपकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि, योग्य वेळी याबाबत आम्ही भुमिका घेऊ. मात्र अद्याप मनसेचे कोणतेही पाऊल उचलेले नाही.
किरण माने प्रकरणी महिला सहकलाकारांचा मोठा खुलासा
गैरवर्तन केल्याप्रकरणी दाखवली बाहेरची वाट@HelloBollywood4 #kiranmane @StarPravah pic.twitter.com/lSSnOmZ9Ra— Vishakha Mahadik (@Princy_Vishu) January 16, 2022
किरण माने प्रकरण नेमके कोणत्या दिशेला जात आहे हे समजण्या आधीच या प्रकरणात अनेक राजकीय पक्षांनी दणादण उड्या घेतल्या आहेत. यानंतर आता माणसे चित्रपट कर्मचारी सेने सक्रिय झाली असून अमेय खोपकर यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिक स्पष्ट केली आहे. अमेय खोपकर याना माध्यमांशी संबंधित प्रकरणाविषयी प्रश्न केले असता त्यांनी सांगितले कि, ‘मला या प्रकरणावर काही बोलायचे नाही, किरण माने यांनीच मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला. योग्य वेळी याबाबत आम्ही भुमिका घेऊ. असे म्हणत खोपकरानी मानेंना कडक इशारा दिला आहे.
पुढे, मी राजकीय भूमिका घेतल्याने मला कुठलीही पूर्वकल्पना न देता मालिकेतून बाहेर काढले गेले असे मानेंनी सांगितले. तर ‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. यात राजकीय भूमिकेमुळे नव्हे तर त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे या सगळ्यावर योग्यवेळी मनसे आपली भूमिका मांडेल, असे अमेय खोपकर म्हणाले आहेत. त्यामुळे आता लवकरच हे प्रकरण आणखी चिघळणार का मिटणार असा संभ्रमित करणारा प्रश्न उभा ठाकला आहे. कारण मनसे भूमिका घेणार म्हणाली आहे अजून घेतलेली नाही. त्यामुळे नेमके काय घडणार असा अनुत्तरित सवाल उपस्थित झाला आहे.