Take a fresh look at your lifestyle.

‘जब वी मेट’ हिट झाला आणि नैराश्यात गेली करीना..!!

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । करीना कपूर खानने बॉलिवूडमध्ये तिच्या कारकिर्दीची २० वर्षे पूर्ण केली आहेत आणि जेव्हा जेव्हा तिच्या सुपरहिट चित्रपटांचा आणि चरित्रांचा उल्लेख येतो तेव्हा दिग्दर्शक इम्तियाज अलीचा शाहिद कपूर स्टारर जब वी मेट या चित्रपटाचा उल्लेख नक्कीच केला जातो. या सिनेमात करीनाने पंजाबमधील एक मुलीचे पात्र रंगविले होते, जे अत्यंत जिवंत होते. करिनाचे हे पात्र इतके मोठे झाले होते की आजपर्यंत लोकांना करीना फक्त या व्यक्तिरेखेसाठीच आठवते. पण करिना तिच्या या चित्रपटाच्या यशानंतर जवळजवळ ६ महिने नैराश्यात गेली होती.

दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या ‘जब वी मॅट’ चित्रपटामध्ये करीना कपूर खान आणि शाहिद कपूर हि जोडीसोबत दिसली होती. पण या चित्रपटाच्या दरम्यान शाहिद आणि करीना, जे बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते , ते एकमेकांपासून विभक्त झाले. जब वी मॅटच्या चित्रीकरणावेळी करीना तिच्या दुसर्‍या चित्रपटाचे शूटिंग देखील करत होती आणि त्याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान करीना सैफ अली खानला भेटली.

या दोन्ही चित्रपटाचा संदर्भ देताना करीनाने तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘मी यश राज बॅनर फिल्म ‘टशन ‘करत होते, यात अक्षय कुमार, सैफ अली खान, अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते.. या चित्रपटात मी मुख्य भूमिकेत होते. त्यासाठी मी झिरो फिगर देखील केली होती. मी ‘जब वी मॅट’ हा फक्त एक सामान्य चित्रपट मानला. माझ्या सर्व आशा ‘टशन’ कडून होत्या. मला वाटले की ‘टशन’ नंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलेल आणि ते आश्चर्यकारक होईल.

Comments are closed.