Take a fresh look at your lifestyle.

जेव्हा फोटोग्राफर्स जेनेलियाला म्हणतात ‘वहिनी’…

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूडमधील सर्वांचे लाडके कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांना ओळखले जाते. मात्र लग्नानंतर जेनेलिया चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी ती अनेक वेळा ती रितेशसोबत फिरताना दिसते. कित्येकदा त्यांचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या जेनेलिया आणि रितेशच्या अशाच एका व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

जेनेलिया-रितेशने नुकताच सारा अली खान आणि वरुण धवनचा आगमी चित्रपट ‘कूली नंबर १’ चित्रपटाच्या रॅप अप पार्टीमध्ये हजेरी लावली. यावेळी जेनेलियाने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि चेक्सचा स्कर्ट परिधान केला होता. या मध्ये ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत होती. तर दुसरीकडे रितेश एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसत होता.


View this post on Instagram

 

#geneliadeshmukh and #riteshdeshmukh today for #coolieno1 completion bash #ViralBhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on Feb 29, 2020 at 12:03pm PST

 

जेव्हा रितेश आणि जेनेलियाने या पार्टीला हजेरी लावली तेव्हा फोटोग्राफर्सची नजर त्यांच्यावर पडली. तेव्हा जेनेलिया फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोज देत होती. पोज देत असताना एका फोटोग्राफरने गंमतीने जेनेलियाला वहिनी असा आवाज देत होते. ते ऐकून जेनेलियाला हसू आलं आणि ती तेथून निघून गेली.