Take a fresh look at your lifestyle.

आलिया च्या वाढदिवशी का गायब झाला रणबीर ???

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या वाढदिवशी म्हणजेच १५ मार्चला तिची मोठी बहीण शाहीन आणि चांगली मैत्रीण आकांक्षा रंजन कपूरसोबत होती ना कि तिचा कथित बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत नव्हती. अशा परिस्थितीत, मीडियाचा एक विभाग असा विचार करत आहे की कदाचित त्यांच्यात सर्व काही ठीक नाही. आलियाने आपला वाढदिवस तिच्या गर्लगॅंगसोबत साजरा केला आणि अभिनेत्रीने तिच्या वाढदिवशी दोन केक कापल्याचे व्हिडिओही व्हायरल झाले.तिचे सहकारी आणि तिचे मित्र,तिची आई सोनी राजदान आणि रणबीरची आई नीतू सिंग यांच्याकडून तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिळाल्या,पण ओडिशा टीव्ही.इन वेबसाइटच्या वृत्तानुसार, रणबीरकडून शुभेच्छा देणारा संदेश मात्र मिळाला नाही.

 

इंडिया टुडे डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, योगायोगाने आलिया भट्टच्या वाढदिवसाच्या एक दिवसानंतर नताशा पूनावालाने इंस्टाग्रामवर एक जुना फोटो शेअर केला होता, तिथे रणबीर कपूर आलियाच्या गालावर किस घेत होता आणि अर्जुन आणि मलायका त्यांच्यामागे एकमेकांना मिठी मारताना दिसत होते हा फोटो न्यूयॉर्कमध्ये घेण्यात आला होता.

 

 

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी आपलं नातं कधीही नाकारलं किंवा स्वीकारलं नाही, पण मीडियाचा एक भाग त्यांना घेऊन नेहमीच जागरूक असतो. त्याचबरोबर बॉलिवूडमधील बरीच लोकंही डिसेंबरमध्ये या दोघांच्या संभाव्य लग्नाची बातमी उत्साहाने सांगत होती. रणबीर आणि आलियाने यावरही मौन बाळगले असले तरी लग्नासाठी पाहुण्यांची यादी आधीच तयार झाली असल्याचा दावा काही व्यक्तींनी केला आहे.त्याचबरोबर दोघे लवकरच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहेत.

 

Comments are closed.