Take a fresh look at your lifestyle.

अर्जुन आणि मलायका डिसेंबरमध्ये लग्न करणार..?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सगळीकडेच लग्नाचे वारे जोरदार वाहताना दिसत आहेत. बॉलिवूड मध्ये तर एका मागे एक लग्नाला बोहल्यावर चढत आहेत. अलीकडेच कॅटरिना कैफ आणि विकी कौशलच लग्न झालं तर मागोमाग रणबीर आणि आलियानेही उरकलं. यानंतर आता चर्चा आहे ती अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या लग्नाची. गेल्या काही वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली देत अनेकदा मीडियाला फटकारले आहे. पण लग्न कधी करणार यावर त्यांनी कधीच भाष्य केले नाही. यानंतर आता मलायका एक एक स्टेटमेंट देत लग्नाचे संकेत देतेय. नुकतेच एका वृत्त वाहिनीने याबाबतचे वृत्त देताना अर्जुन मलायका डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचेच सांगितले आहे.

‘इंडिया टीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, यंदा नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात अर्जुन आणि मलायका लग्न करणार आहेत असं समजतंय. मुख्य म्हणजे मुंबईतच आणि अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत ते लग्न करणार आहेत अशीही माहिती दिली जातेय. त्यानंतर मित्र परिवारासाठी ते एका भव्य रिसेप्शनचे आयोजन करणार आहेत असेही या वृत्तात म्हटले आहे. अगदी पहिल्यापासूनच अर्जुन आणि मलायकाचं नातं चर्चेत राहिलं आहे. कारण अर्जुन आणि मलायका दोघांच्या वयातील अंतर तब्बल १२ वर्षांचे आहे. मलायका ४८ वर्षांची असून अर्जुन हा ३६ वर्षांचा आहे.

आपल्या नात्याविषयी व्यक्त होताना अलीकडेच मलायका म्हणाली होती कि, “प्रत्येक नात्यात पुढे काय होणार आणि कुठपर्यंत आपण सोबत जाणार याचा योजना आधीच आखलेल्या असतात. भविष्यात आपण एकमेकांना एकत्र पाहतोय का..? हे माहित असणं सर्वांत महत्त्वाचं असतं. अरे, पुढे काय होणार हे मला माहित नाही.’ असं कोणी म्हणणारं असेल तर त्या नात्यात मी नाही. मला असं वाटतंय की आम्ही आता अशा टप्यावर आहोत जिथे आम्ही नात्याच्या भविष्याचा विचार करतोय. आम्ही गोष्टींवर खूप चर्चा करतो. याबाबतीत दोघांचेही विचार आणि कल्पना सारखेच आहेत.