Take a fresh look at your lifestyle.

‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ फेम अभिनेत्रीसह कुटुंबातील सात जणांना कोरोना 

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र होत आहे. अनेक सेलिब्रिटी देखील कोरोनाचे बळी ठरत आहेत. नुकतेच बॉलिवूड संगीतकार वाजिद खान यांचे निधन झाले. त्यांना कोरोनाचे संक्रमण झाले होते. आता अशीच एक  माहिती मिळाली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ फेम अभिनेत्रीला आणि तिच्या कुटुंबातील ७ जणांना कोरोना झाला असल्याची माहिती समोर आली आहे.  या मालिकेत कीर्तीची भूमिका करणारी अभिनेत्री मोहेना कुमारी हिला व कुटुंबाला कोरोनाचे निदान झाले आहे. एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत तिने स्वतः त्यांचे अहवाल सकारात्मक झाल्याचे सांगितले आहे.

सोमवारी त्यांचे अहवाल आले होते. “आमचे अहवाल सकारात्मक आल्याची बातमी खरी आहे. माझ्या सासूला सर्वप्रथम कोरोना झाल्याचे आम्हाला समजले. आमच्यामध्ये सौम्य लक्षणे होती, पण आम्हाला वाटले की वातावरणातील बदलामुळे हे झाले असावे. मात्र तपासणी केल्यावर आमचे अहवाल सकारात्मक आले आहेत. आता आम्ही विलगीकरणात आहोत आणि आमच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच आम्हा सर्वांची प्रकृती उत्तम आहे.” असे तिने सांगितले.

तिच्या इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, हा काळ आमच्या कुटुंबासाठी खूप कठीण आहे. मला झोप येत नाही आहे.  पण आम्ही लवकरच यातून बाहेर पडू. मोहेनाने उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांच्या मुलाशी सुयेश रावत याच्याशी लग्न केले आहे. डान्स इंडिया डान्स मधून ती लोकांना माहित झाली. ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ मधून तिला अभिनयात चांगला ब्रेक मिळाला.