Take a fresh look at your lifestyle.

हो माझं लग्न ठरलं आहे;अनुष्का शेट्टीने दिली प्रतिक्रिया

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिच्या एका भारतीय क्रिकेटर बरोबरच्या लग्ना विषयीच्या चर्चा रंगल्या होत्या. लवकरच अनुष्का या क्रिकेटरशी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं. विशेष म्हणजे तो रणजी क्रिकेटर आहे शिवाय तो दाक्षिणात्य नसून उत्तर भारतातील आहे असंही म्हटलं जात होतं. इतकेच नाही तर हा क्रिकेटर एका दाक्षिणात्य रणजी संघाकडून सामनेही खेळतो.

त्यावर अनुष्का शेट्टीने आपली प्रतिक्रिया देताना म्हंटले की, ‘एकदा लोकांनी सांगितलं होत की मी प्रेमात आहे आणि नंतर मी कोणालाही न सांगता लग्न केल्याच्या चर्चा रंगात होत्या. आता एका क्रिकेटरसोबतच माझं नाव जोडलं जात आहे. त्यामुळे आता मीही एक अशी अफवा उडवणार आहे की माझं लग्न ठरलं आहे. जेणेकरून या सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळेल.’

अनुष्का पुढे म्हणाली की, तिच्या रिलेशनशिपच्या आणि लग्नाच्या अनेक अफवा सतत तिच्या कानावर येत असतात. पण तिच्या लग्नाचा निर्णय मात्र तिचे आई- बाबा घेणार असल्याचं अनुष्काने सांगितलं. तेच लग्नाचा योग्य निर्णय घेतील असंही अनुष्काने स्पष्ट केलं आहे.

अनुष्का शेट्टी ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील मुख्य अभिनेत्रींपैकी एक आहे. सिनेमांमध्ये पदार्पण करण्यापासूनच तिचं नाव व्यावसायिक, डॉक्टर यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. सुपरस्टार प्रभाससोबतही तिचं नाव जोडलं गेल होतं.त्यांच्या लग्नाविषयीच्या बातमीने चांगलाच जोर धरला होता.

Comments are closed.

%d bloggers like this: