Take a fresh look at your lifestyle.

अमिताभ बच्चन यांनी शेयर केला ‘हा’ जुना फोटो; म्हणाले मुलं कधी मोठी झाली समजलंच नाही

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असतात.अभिनेता अमिताभ बच्चन यांचा ट्विटरवर सर्वाधिक वावर असल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. हल्ली ते आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून बरेच फोटो शेअर करत असतात. बऱ्याचदा आपल्या जुन्या सिनेमांचे फोटो तर आपल्या कुटुंबासोबतचे देखील फोटो शेअर करत असतात. नुकताच त्यांनी अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता नंदा हिचा एक फोटो शेअर केला आहे.

हा फोटो शेअर करत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. बिग बींनी शेअर केलेला फोटो जुना असून यात अभिषेक आणि श्वेता लहान असल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी कसे काय इतके मोठे झालात? असे लिहिले आहे. बिग बींचे त्यांच्या कुटुंबावर असणारे प्रेम सर्वानाच माहित आहे. ते सतत आपल्या कुटुंबाबद्दलचे प्रेम सोशल मीडियावर व्यक्त करत असतात.

दरम्यान, बिग बी यांचं त्यांच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम असून प्रत्येक वेळी त्यांचं कुटुंबाप्रतीचं प्रेम पाहायला मिळतं. अनेक वेळा ते श्वेता, आराध्या यांच्यासोबतचे फोटो शेअर करत असतात. अलिकडेच त्यांची मुख्य भूमिका असलेला ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना विशेष भावल्याचं पाहायला मिळालं आहे.