Take a fresh look at your lifestyle.

तू गेलीस आणि अख्खा महाराष्ट्र पोरका झाला; मराठी कलाकारांनी सिंधुताईंना वाहिली श्रद्धांजली

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनाथांच्या डोक्यावर मायेचा हात ठेवून आज संपूर्ण जगाचा निरोप घेत सिंधुताई सपकाळ अनंतात विलीन झाल्या. ‘अनाथांची माय’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि समाजसेवेचे व्रत घेतलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी रात्री ०८ वाजून १० मिनिटांनी पुण्याच्या गॅलेक्सी रुग्णालयात हृदय विकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. दरम्यान त्या ७४ वर्षाच्या होत्या. यांच्या निधनानंतर सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. अगदी राजकीय नेते, कलाविश्वातील कलाकार आणि माईंची लेकरं अशा प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू, छातीत हुंदके आणि अबोल वाचेतून त्यांचे दुःख व्यक्त करीत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माईंना श्रद्धांजली वाहिली आहे. यात अगदी गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक, गायक, कलाकार, लेखक, नेतेमंडळी, मुख्यमंत्री आणि अगदी पंतप्रधान अशा प्रत्येकाचा समावेश आहे.

मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी हिने काव्यपंक्तींमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या कवितेचे शीर्षक असेच होते आहे. तर ‘मी सिंधुताई सपकाळ’ या सिंधुताईंच्या जीवनाचे भाष्य करणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनीदेखील माईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आल्या शोकसंवेदना व्यक्त करताना लिहिले कि, ‘फ्लॉरेन्स नाईटिंगेलला माझं शेवटचं विनम्र अभिवादन’.

यानंतर मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने माईंना आदरांजली देताना ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये सोनालीने लिहिले कि, पद्मश्री, समाजभूषण, अनाथांची यशोदा, सगळ्यांची माय सिंधुताई सपकाळ. आज आपल्यात नाहीत. खरंच दुःखद घटना.. त्यांच्या आजवरच्या महानकार्याला मानाचा मुजरा त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचर्णी प्रार्थना.

तर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ट्विट करून माईंना श्रद्धांजली वाहिली आहे. शोकाकुल भावनेने रेणुका यांनी ट्विटमध्ये लिहिले कि, समाजसेवेचं एक पर्व संपलं.

याशिवाय मराठी अभिनेता – दिग्दर्शक हेमंत ढोमे यानेही ट्विट करीत आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. हेमंतने आपल्या ट्विटमध्ये लिहिले कि, महाराष्ट्र आज अनाथ झाला.

तर अभिनेता सुबोध भावे याने ट्विट करीत लिहिले कि, माई… भावपूर्ण श्रध्दांजली. याशिवाय दिग्दर्शक अभिनेता प्रसाद ओक यानेही ट्विटरवर भावपूर्ण श्रद्धांजली लिहीत माईंचा फोटो शेअर केला आहे.

माई खरोखरच आई होत्या. त्यांनी अनेक अनाथ मुलांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळले. मोठे केले. न्हाऊ माखू करीत मुलांना मोठ्या हुद्द्यांपर्यंत पोहचवले. त्यांचे कार्य खरोखरच सलाम करण्याजोगे आहे.
अनाथांची माय आणि समाजसेवेचे अमर चक्र सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली।