Take a fresh look at your lifestyle.

१७ वर्षांच्या अभिनेत्रीची, ‘या’ ५८ वर्षांच्या सुपरस्टार सोबत लग्न करण्याची इच्छा !

इडियट बॉक्स । अभिनेत्री अनुष्का सेन ‘बालवीर’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतून प्रकाशझोतात आली. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ‘बालवीर’मध्ये अनुष्काने मेहेर नावाच्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. वयाच्या अगदी १२व्या वर्षी केलेली ही व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरते.

   या टीव्ही अभिनेत्रीचा जन्म झारखंडमध्ये झाला होता. सध्या ती मुंबईत राहात आहे. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत अनुष्काला तिचा आवडता अभिनेता कोण? हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर तिने अभिनेता जॉनी डेप हे उत्तर दिले होते. पायरेट्स ऑफ द कॅरेबियन फेम जॉनी डेप हा अनुष्काचा सर्वात आवडता अभिनेता आहे. अनुष्काला जर संधी मिळाली तर त्याच्यासोबत तिला डेटवर जाण्याची इच्छा आहे. किंबहूना तिला जर संधी मिळाली तर जॉनीसोबत लग्न देखील करण्यास तयार आहे असेही ती गंमतीशीर अंदाजात या मुलाखतीत म्हणाली. अनुष्का सध्या १७ वर्षांची आहे व जॉनीचे वय ५८ आहे या पार्श्वभूमीवर वडिलांच्या वयाच्या अभिनेत्यासोबत तिची लग्नाची इच्छा पाहून सर्वानाच आश्चर्य वाटले.

  आपल्याकडील नवीन पिढीतील बऱ्याच जनांप्रमाणे अनुष्काला भारतीय चित्रपटांपेक्षा हॉलिवूडपट खूप जास्त आवडतात. विशेषत: तिला हॅरी पॉटर, कॉज्युरिंग, कोको, इटी या प्रकारचे सायन्स फिक्शन चित्रपट आवडतात. अनुष्काने बालवीरनंतर झांसी की रानी या मालिकेत देखील काम केले होते झांसी की रानी या मालिकेत तिने राणी लक्ष्मीबाई यांच्या बालपणाची व्यक्तिरेखा साकारली होती. तिने आपल्या या इंटरव्ह्यू नंतर सोशल कट्ट्यावरील चर्चेत जागा मिळवली.

Image result for johnny depp handsome

Image result for anushka sen

Image result for anushka sen

Image result for anushka sen

 

Comments are closed.