Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता कबीर बेदीने सनी लिओनीला मागितला मोबाईल नंबर, त्यानंतर या अभिनेत्रीने असे काही केले की…

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडर लाँचवेळी आयोजित केलेल्या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक स्टार दिसले. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदीही या कॅलेंडर लाँच कार्यक्रमात हजर होते आणि तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी बॉलिवूडमधील अनेक स्टारशी संवाद साधला. डब्बू रतनानीच्या कॅलेंडर लॉन्चवेळी कबीर बेदीने सनी लिओनीची ही भेट घेतली. इतकेच नाही तर या ज्येष्ठ अभिनेत्याने सनी लिओनीला तिच्या क्रमांकाबद्दल विचारणा केली, त्यावर अभिनेत्रीने असे काही केले ज्यामुळे कोणालाही आश्चर्य वाटेल.

मिळालेल्या वृत्तानुसार, सनी लिओनीने आपला नंबर तर दिला नाहीच परंतु तिने कबीर बेदी यांना आपला पती डॅनियल वेबर याचा नंबर दिला. कबीर बेदी यांनी नंबर विचारल्यावर,कोणालाही चकित करेल असे पाऊल सनी लिओनी उचलले.डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडरमध्ये या वेळी भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी यांच्या फोटोज् ने बरीच चर्चा रंगविली आहे.त्यांच्याशिवाय विक्की कौशल, कृती सॅनॉन, सनी लिओनी आणि अनेक प्रसिद्ध स्टार डब्बू रतनानीच्या कॅलेंडरमध्ये दिसले.

सनी लिओनीने नुकताच ‘स्प्लिट्सविला’ रिऍलिटी शो होस्ट केला. त्याचबरोबर चित्रपटांच्या बाबतीत सांगायचे तर सनीने २०१२ मध्ये पूजा भट्टच्या ‘जिस्म २’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.यानंतर ती अनेक गाण्यांमध्येही दिसली आहे. विशेषत: ‘रईस’ या चित्रपटात तिच्या लैला गाण्याने मोठा धमाका केला होता. आता लवकरच ती ‘कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरमादेवी’ या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपटांमध्ये दिसणार आहे.