Take a fresh look at your lifestyle.

Disha Patani : उफ्फ.. मार डाला रे! अभिनेत्री दिशा पटानीच्या बिकिनी लूकने चाहत्यांच्या जीवाचे केले हाल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सोशल मीडिया लाईफ अगदी सक्रियतेने जगते. तिच्या अभिनयापेक्षा जास्त तिच्या सौंदर्यावर फिदा असणाऱ्यांची संख्या काहीशी जास्त आहे. त्यामुळे तिने सोशल मीडियावर कधीही कोणत्याही लुकमधील फोटो शेअर केला आणि तो व्हायरल झाला नाही असे कधीच झाले नाही. असे असताना नुकतेच तिने आपल्या कर्वी बॉडीचे हॉट फोटोशूट शेअर केले आहे. यामध्ये तिचा बिकीनीतील आत्मविश्वास तिच्या सौंदर्याला आणखीच धार देताना दिसत आहे. त्यामुळे तिचे हे बिकनीतील फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) हिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा हॉट आणि ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर केला आहे. या फोटोमूळे दिशांच्या चाहत्यांचे जीवाचे पुरते हाल झाले आहेत. या फोटोमध्ये दिशाने नारंगी रंगाची बिकिनी परिधान केली आहे. यामध्ये दिशा अत्यंत हॉट आणि ब्युटी स्पॉट दिसतेय. शिवाय या फोटोत तिने अत्यंत मोहक अंदाजातील पोझ दिली आहे. ज्यामुळे चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. तसेच या फोटोमध्ये दिशाने मोकळे सोडलेले केस या फोटोला आणखीच सुंदर बनवीत आहेत. तर चेहऱ्यावर येणारे सूर्यकिरण तिला कोणत्याही मेकअपची गरज नाही असेच भासवीत आहे. एकंदरच हा लुक चाहत्यांना घायाळ करणारा आहे. त्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करतोय.

काय म्हणाले नेटकरी..? (Disha Patani)

दिशाच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणी ब्युटीफुल म्हणतंय, तर कुणी तिच्या टोन बॉडीचे कौतुक करत आहे. अभिनेत्री दिशा पटानी हिने ‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ (MS Dhoni – The Untold Story) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. सध्या तिच्या वर्क फ्रन्टबद्दल बोलायचे तर, दिशाने नुकतेच करण जोहरच्या सिद्धार्थ मल्होत्रा ​​अभिनीत ‘योद्धा’ या अॅक्शन चित्रपटात काम केले आहे. अलीकडेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. तर या वर्षी तिचा ‘एक व्हिलन 2’ हा चित्रपट देखील रिलीज होत आहे. यामध्ये तिने जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे.


हे पण वाचा –

दिशा पटानी दिसली खूपच मनमोहक अंदाजात… फोटो झाले व्हायरल 

दिशा पटानी व आदित्य रॉय कपूरचा १ मिनिटांचा अंडरवॉटर ‘किस’….