Take a fresh look at your lifestyle.

बॉयफ्रेंडबरोबरच्या ब्रेकअपनंतर डिप्रेशनमध्ये गेली ही बिग बॉस स्पर्धक,खाल्ल्या झोपेच्या गोळ्या…

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉसची माजी स्पर्धक सना खान तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिने सोशल मीडियावर तिच्या ब्रेकअपबद्दल खुलासा केला. ती दीर्घकाळ डान्सर आणि कोरिओग्राफर मेलव्हिन लुईस यांच्याशी रेलशनशिपमध्ये होती.सनाने त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला. ब्रेकअपनंतर ती नैराश्यातून जात आहे. या व्यतिरिक्त सनाने आणखी बरेच खुलासे केले आहेत.

सना खानची नुकतीच स्पॉटबॉय या इंग्रजी संकेतस्थळाने मुलाखत घेतली. यादरम्यान तिने सांगितले की ब्रेकअपनंतर ती खूपच खचलेली आहे. सना म्हणाली, ‘आजकाल मी नैराश्याने व चिंतेने ग्रस्त आहे. आता मी हळू हळू बरी होत आहे व स्वतःची काळजी घेत आहे. माझे कुटुंब माझ्या बरोबर आहे मी गेल्या २० दिवसांपासून झोपेच्या गोळ्या घेत आहे, परंतु दोन दिवसांपासून मला कोणत्याही गोळ्या घ्यावा लागल्या नाहीत आणि याबद्दल मी खूप आनंदी आहे. माझे चाहते माझ्या पोस्टला दिलेल्या कमेंटमध्ये लिहितात,”पुढे जा, मी त्यांना सांगू इच्छितो की हे वाटते इतके सोपे नाही.”

 

सना खान पुढे म्हणाली की, “फसवे लोक लवकर सावरतात, परंतु ज्यांचे खरे प्रेम आहे त्यांना थोडा वेळ लागतो.” सनाच्या म्हणण्यानुसार, लवकरच मेलविन लुईशी तिचे लग्न होणार होते, पण मेलविनने जेव्हा तिची फसवणूक केली तेव्हा ती खूप भावनिक झाली. ब्रेकअपची घोषणा केल्यानंतर सनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मेलव्हिनवर अनेक आरोप केले. सनाने १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केले होते.

त्यात तिने लिहिले की, ‘फसवणूक करणे ही चूक नाही. हा एक विचारपूर्वक कट आहे. ज्या दुःखातून मी गेलीये त्याची किंमत तो कधीही देऊ शकत नाही. याकाळात ज्यांनी मला साथ दिली त्या सर्वांचे आभार.हे ऐकून मला फार वाईट वाटले की,त्याच्यामुळे एक लहान मुलगी गरोदर राहिली. तो मुलींकडून पैसे घेत असे, तसेच तो आपल्या विद्यार्थ्याशी छेडछाड करायचा. तो कोणत्या प्रकारचे शिक्षक होता हे यावरून दिसून येते. या सर्व गोष्टींनी मला भीती वाटली. म्हणूनच तो आजपर्यंत संघर्ष करीत आहे. देव त्याला शिक्षा करील.’

यापूर्वी सना खानने आपल्या मुलाखतीत म्हटले होते की,’तो फसवणूक करणारा आहे आणि लबाड आहे आणि सर्व काही आपल्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेसाठी करतो. ही योग्य माहिती आहे, त्यात कोणतीही भेसळ नाही. याशिवाय मे-जूनपासून आपली फसवणूक होत असल्याचेही सनाने सांगितले. सना यांच्या वक्तव्यानंतर मेलविन लुईस यांनी प्रतिक्रिया दिली. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये,एक गाणे प्ले होत आहे – ‘बुलाती है मगर जाने का नहीं। मेलविनने जो टीशर्ट घातिला आहे त्यावरही हेच लिहिलेल आहे. या पोस्टसह त्याने लिहिले – ‘जिंकण्यासाठी.’ मेलव्हिनने कोणतेही नाव घेतले नाही परंतु हे उघड आहे की त्याचा संदेश फक्त सना खानसाठी आहे.