Take a fresh look at your lifestyle.

अवघ्या दोन महिन्यांत ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । छोट्या पडद्यावर आजपर्यंत अनेक मालिका प्रदर्षीत झाल्या आहेत.मात्र काही मोजक्याच मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.अशीच एक मालिका काही वर्षांपूर्वी आली होती जिचे नाव होते ‘अग्निहोत्र’.दिग्गज कलाकार, उत्तम कथेची गुंफण आणि तितकंच उत्तम दिग्दर्शन अश्या गोष्टी जुळून आल्यामुळे ‘अग्निहोत्र’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. ‘अग्निहोत्र’ ही मालिका छोट्या पडद्यावर खूप गाजली. त्यानंतर तब्बल १० वर्षांने नव्या कथेसह ‘अग्निहोत्र २’ ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘अग्निहोत्र २’साठीही जोरदार तयारी सुरु झाली होती. मात्र ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

टीआरपीच्या स्पर्धेत ही मालिका मागे पडत असल्यानं निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोलले जात आहे. येत्या ९ मार्चला या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. पण हा शेवटसुद्धा रंजक असा असणार आहे. मालिकेच्या शेवटच्या एपिसोडमध्ये एक मोठा ट्विस्ट असणार आहे. या मालिकेची जागा ‘वैजू नंबर १’ ही नवी मालिका घेणार आहे.

पहिल्या पर्वातलं अग्निहोत्री कुटुंब आणि आठ गणपतींच्या रहस्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘अग्निहोत्र २’ मध्ये नव्या पिढीची नवी गोष्ट दाखविताना सप्तमातृकांचं रहस्य उलगडताना दाखविले आहे.परंतु पहिल्या पर्वा प्रमाणे प्रेक्षकांची मने जिंकण्यात हि मालिका अयशस्वी ठरल्याचे दिसून येते आहे. या मालिकेत शरद पोंक्षे व रश्मी अनपट यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Comments are closed.

%d bloggers like this: