Take a fresh look at your lifestyle.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’चित्रपटाचे कौतुक,म्हणाले…

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । आयुषमान खुरानाचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट रिलीज झाला आहे.या चित्रपटामध्ये आयुषमान आणि जितेंद्र कुमार यांची प्रेमकथा दाखविली आहे. हा चित्रपट समलिंगी संबंधांबद्दल आहे. हा चित्रपट भारताबरोबर परदेशातही पसंतीस उतरत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आयुषमानच्या या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

‘शुभ मंगल ज्यादा सावधान’चित्रपटाबद्दल ब्रिटिश कार्यकर्ते पीटर गॅरी टॅचेल यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले- मला आशा आहे की समलैंगिकतेच्या रोमांसवर बनलेला बॉलीवूड चित्रपट हा अनेक लोकांची माने जिंकू शकेल. पीटरच्या ट्विटला पुन्हा रिट्विट करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिले- ‘ब्रिलियंट.’डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला पुन्हा रिट्विट करत पीटरने लिहिले – मला आशा आहे की अध्यक्ष पीएम ट्रंपने एलजीबीटीचे मुद्दे गांभीर्याने घेण्याची हि सुरावात असून कुठला पब्लिसिटी स्टंट नाही.

 

पीटर गॅरी टॅचेल हे ब्रिटीश मानवाधिकार अभियानकार आहेत. ते एलजीबीटी समुदायाच्या सामाजिक प्रश्नांसाठी काम करतात.‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाची चर्चा अधिक सावधगिरीने केली जाते आहे,त्यात कॉमेडीबरोबर समलिंगी जोडप्याचे संबंध अगदी सामान्य पद्धतीने दर्शविले गेले आहेत जेणेकरुन लोकांना ते समजेल. या चित्रपटात आयुषमान आणि जितेंद्र यांच्यासह नीना गुप्ता, गजराज राव, मानवी गगारू, पंखुडी अवस्थी, सुनीता राजवार आणि मानुषी चड्ढा हे मुख्य भूमिकेत आहेत.

 

Comments are closed.

%d bloggers like this: