Take a fresh look at your lifestyle.

बॉक्स ऑफिस लढतीत आमीर समोर अक्षय कुमारची माघार !

सोशल कट्टा । सुपरस्टार आमीर खानचे चित्रपट सहसा ख्रिसमसला रिलीज होतात, त्याचा येणार चित्रपट लाल सिंग चड्डा या वर्षी रिलीज होणार आहे, मात्र या वर्षीचा ख्रिसमस २ वर्षांपूर्वीच खिलाडी अक्षय कुमारने बुक केला होता. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. आमिरने एका प्रथा पाडली होती, २५ डिसेम्बरची पण अक्षयचा बच्चन पांडे आधीपासूनच तयारीत असल्यामुळे मागे कोण हटणार कि क्लॅश होणार असं विचार चालू होता. मात्र आमिरने अक्षयकडे शब्द टाकला, अक्षयनेही तो पडू दिला नाही, आणि बच्चन पांडे निर्मात्यांकडून पुढं ढकलला गेला.

   यंदाच्या ख्रिसमसला अक्षय कुमारचा बच्चन पांडे आणि आमिर खानचा लाल सिंह चड्ढा सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित होणार होता. पण आता ख्रिसमसला फक्त आमिर आणि करिना कपूरचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. बच्चन पांडेच्या निर्मात्यांनी सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला. अक्षय कुमार आणि चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी बॉक्स ऑफिसच्या शर्यतीतून स्वतःला वेगळं करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतः आमिरने ट्विटरवर याची माहिती दिली.

   आमिरने ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘अनेकदा फक्त बोलून प्रश्न मिटतात. माझे मित्र अक्षय कुमार आणि साजिद नाडियावाला यांनी माझ्या विनंतीवर त्यांच्या बच्चन पांडे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली यासाठी दोघांचे आभार. त्यांच्या सिनेमासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा.’ अक्षय कुमारने माघार घेतल्यानंतर आता बच्चन पांडे सिनेमा पुढच्या वर्षी २१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

   दरम्यान, अक्षय कुमारचा या सिनेमातील फर्स्ट लुकही समोर आला आहे. यात अक्षयने सोनेरी किनार असलेली काळ्या रंगाची धोती नेसली आहे. तसेच गळ्यात सोन्याच्या जाड चैन घातल्या आहेत.

 

 

Comments are closed.