Take a fresh look at your lifestyle.

आमिर खानच्या महत्त्वाकांक्षी ‘महाभारता’चं काय झालं ?

टीम, हॅलो बॉलीवूड । दोन वर्षांमागे आमिरने महाभारतावर आतंरराष्ट्रीय स्तरावरचा दर्जा असणारी वेबसिरीज काढायचं ठरवलं होत. त्याची हि मत्त्वाकांक्षी योजना कुठेतरी मागे पडलेली आपल्याला दिसते. ना त्याची कोणी चर्चा करताय ना कोणी प्रश्न विचारतय.

सूत्रांचे म्हणणे असे आहे की आमिर आपला ड्रीम प्रोजेक्ट एवढ्या सहज सहजी सोडणार नाही. “आमिर स्वप्न पाहतो. पण तो व्यावहारिक स्वप्न पाहणारा आहे. तो पूर्ण आकलन आणि अभ्यासाशिवाय अशी घोषणा करणार नाही. तो माघार घेणार नाही, प्रोजेक्ट काही काळासाठी थांबवण्यात आला आहे.

आमिर ज्या स्तरावर महाभारत बनवण्याची योजना करीत आहे तो एक अत्यंत बिग बजेट प्रोजेक्ट बनला आहे. आणि आमिरला फक्त ए-लिस्ट स्टार्स कास्ट करायचे आहे. तसे पाहता आमीर भगवान कृष्णांची भूमिका करायला खूप उत्सुक आहे असे समजते. देशातील सद्य हवामान लक्षात घेता ही कदाचित चांगली गोष्ट असू शकत नाही. असो

सूत्र अजून असही म्हणतं की “आमिरने महाभारत तयार करण्यासाठी अधिक काळ प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी या प्रकल्पासाठी 2019-20 बाजूला ठेवले होते. परंतु जेव्हा हे विविध कारणांमुळे पुढे ढकलला गेला आहे. त्याचा सध्या लाल सिंग चड्डा येऊ घातलाय. येत्या एक दोन प्रोजेक्ट्स नंतर तो महाभारत सत्यात उतरवायची योजना आखेल अशी अपेक्षा करू.