Take a fresh look at your lifestyle.

टाळ्या-थाळ्या झाल्या, आता डीजे वाजवायचा का?; बॉलिवूड गायकाचा केंद्राला सवाल

हॅलो बॉलिवूड ऑनलाइन | बॉलिवूड गायक आणि संगीत दिग्दर्शक विशाल दादलानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो कायम प्रतिक्रिया देत असतो. यावेळी त्याने करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारवर निशाणा साधला आहे. करोना थांबवण्यासाठी डीजे वाजवून पाहूया का? असा उपरोधिक टोला विशालने लगावला आहे.

करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. अगदी लॉकडाउनचा पर्याय स्विकारुनही करोना नियंत्रणात आलेला नाही. उलट लॉकडाउनच्याच काळात देशभरातील लाखो लोकांना करोनाची लागण झाली. या पार्श्वभूमीवर विशाल दादलानी याने ट्विट करुन सरकारवर टीका केली. “शेठ, देशात ५०० करोना पेशंट होते तर टाळ्या थाळ्या वाजवल्या आता आठ लाख झाले आहेत. आपण डीजे वाजवून पाहूया का?” असं ट्विट करत त्याने उपरोधिक टोला लगावला आहे.

दर तासांला एक हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण देशात आढळून येत आहेत. देशात गेल्या चार दिवसांत एक लाख नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या आठ लाख्यांच्या पुढे गेली आहे.