Take a fresh look at your lifestyle.

भूमी पेडणेकर आणि तनाज इराणी यांनी मासिकपाळीसंबंधी व्यक्त केली प्रतिक्रिया,म्हणाल्या-‘अजूनही…’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तनाज इराणी या आश्चर्यचकित झाल्या आहेत की लोक अजूनही मासिक पाळीबद्दल बोलतच नाहीत आणि यावर त्यांचे जुने विचार अद्यापही कायम आहेत. या दोन्ही अभिनेत्रींनी यावर उघडपणे बोलण्यावर जोर दिला.

एक मुलगा आणि एक मुलगी यांची आई असलेल्या तनाज म्हणतात, “आई म्हणून मला विश्वास आहे की जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा आई आणि मुलगी यांच्यातील संभाषण अधिक खुलेपणाने व्हावा.” स्त्रियाना या विषयांविषयी बोलण्यास लाजिरवाणे वाटते. माझी मुलगी मित्रांकडे जाण्याऐवजी माझ्याशी याबद्दल बोलू इच्छित आहे. “

भूमी याबद्दल सांगतात, “मासिक पाळीच्या काळात मुलींना शाळेत पाठविण्याला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना काळजी वाटते. अद्यापही एक समस्या आहे कि लोकांची जुनी विचारसरणी अजूनही अबाधित आहे. हे जाणून मला आश्चर्य वाटले. मासिक पाळी दरम्यान पुरेसे शिक्षण नसल्यामुळे दर वर्षी पाचपैकी एक मुलगी शाळा सोडत आहे. ”
भारतातील वेगवेगळ्या भागात मासिक पाळीमुळे मुलींनी शाळेत जाणे बंद केले आणि एका पॅडमेकिंग कंपनीने या विषयावर जनजागृती करण्याचा निर्णय घेतला.