Take a fresh look at your lifestyle.

शाहिद कपूरची आई नीलिमा अजीमने अनेक वर्षांनंतर उघड केले पंकज कपूरबरोबरच्या घटस्फोटाचे खरे कारण

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । शाहिद कपूरची आई नीलिमा अजीम या अभिनेता पंकज कपूर यांच्या माजी पत्नी आहेत. या दोघांच्या घटस्फोटाच्या अनेक वर्षानंतर आता नीलिमाने याविषयी उघडपणे सांगितले आहे. एका मुलाखतीत नीलिमा यांनी हे उघड केले की,” विभक्त होण्याचा निर्णय हा माझा नव्हता, ते खूप पुढे गेले होते. शाहीस साडेतीन वर्षाचा असल्यापासून नीलिमाने त्याला एकटीनेच मोठे केले.

पिंकविलाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नीलिमा म्हणाल्या, “मी एकटीनेच वेगळे करण्याचा निर्णय घेतलेला नव्हता. खरंतर ते आयुष्यात खूपच पुढे गेले होते आणि मला तर पोट भरणे देखील अवघड होते.” नीलिमा पुढे म्हणाल्या-“ जेव्हा नातेसंबंध तूटतात, तेव्हा त्याला घटस्फोट म्हणतात, जे दोघांसाठीही त्रासदायक ठरते. होय, मैत्री आणि आसक्ती होती, पण मन मात्र दुखावले गेले होते. आज ते आपल्या कुटूंबियांसह आनंदात आहेत आणि ते नेहमी खुश रहावो अशी माझी इच्छा आहे. ”

नीलिमा यांनी पुढे सांगितले की तिचे मित्र आणि कुटूंबियांच्या मदतीने ती यामधून बाहेर पडू शकली.तिची सर्वात मोठी ताकद शाहिद असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. .

नीलिमा आणि पंकज यांनी १९७५ साली लग्न केले. पण लग्नाच्या अगदी काही वर्षातच हे दोघे विभक्त झाले. नंतर १९८४ मध्ये पंकजने सुप्रिया पाठकशी लग्न केले. सुप्रिया आणि पंकज यांना सना कपूर आणि रुहान कपूर अशी दोन मुले आहेत. त्याच वेळी नीलिमाने १९९१ मध्ये राजेश खट्टरशी लग्न केले आणि दोघांना एक मुलगाही झाला ज्याला आपण ईशान खट्टर म्हणून ओळखतो. नीलिमा आणि राजेश खट्टर यांचे लग्नही फार काळ टिकू शकले नाही. २००४ मध्ये नीलिमा यांनी रझा अली खानसोबत लग्न केले होते, मात्र हे लग्नही २००९ मध्ये तूटले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.