Take a fresh look at your lifestyle.

Happy birthday neetu singh! पाहुयात ऋषी कपूर – नीतूसिंग लव्ह स्टोरी

हॅलो बॉलीवुड ऑनलाईन | जेव्हा जेव्हा बॉलीवुड मध्ये लव्ह स्टोरी ची चर्चा केली जाते तेव्हा अभिनेत्री नीतू सिंग आणि अभिनेता रूषी कपूर यांची नावे त्यामध्ये नेहमीच लक्षात राहतात. या दोघांची प्रेमकथा अजूनही बीटाऊनमध्ये बरीच लोकप्रिय आहे. एकत्र काम करत असताना दोघांची मैत्री झाली आणि नंतर ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले,हे त्यांना स्वतःलाही माहित नव्हते. 70 च्या दशकातील अत्यंत सुंदर अभिनेत्री नीतू सिंगचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 8 जुलै 1958 रोजी दिल्ली येथे झाला होता.

आज नीतू 61 वर्षांची आहे. तथापि, रूषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू सिंग यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. इतक्या वर्षानंतरची ही पहिलीच वेळ असेल जेव्हा रूषी कपूर या खास प्रसंगी त्यांच्यासोबत नसतील. आज आम्ही तुम्हाला नीतू सिंग आणि रूषी कपूरच्या प्रेमकथेविषयी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्यांची सुंदर लव्ह स्टोरी …

रूषी कपूर यांचे नाव यापूर्वी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्याशी चांगलीच चर्चेत होते. दोघांनी मिळून ‘बॉबी’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या दरम्यान त्याच्या आणि डिंपलच्या अफेअरच्या बातम्या आल्या, पण वडिलांच्या भीतीमुळे तो कधीही प्रेम व्यक्त करू शकला नाही. यानंतर 1974 ला रूषी कपूर यांनी नीतू सिंग यांच्यासमवेत ‘जाहला इंसान’ हा चित्रपट केला. त्यावेळी नीतू अवघ्या 14 वर्षांची होती. सेटवर रूषी नीतूला खूप त्रास देत असत, त्यामुळे नीतू सिंग चिडचिडत असत.

पण या दोघांमधील हा कलह हळूहळू प्रेमात बदलला आणि दोघेही प्रेमात पडले. यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. नीतू रूषी कपूरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल गंभीर होती. हे रूषी कपूरसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला माहित होते. यावेळी राज कपूरने त्यांनाही स्पष्टपणे सांगितले