Take a fresh look at your lifestyle.

नवऱ्याच्या प्रेयसीला बायकोने झाडल्या गोळ्या; युटूबवरून घेतले प्रशिक्षण 

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । विवाहबाह्य संबंधांमुळे पती पत्नीमध्ये वाद झालेले, त्यांच्यामध्ये घटस्फोट झाल्याच्या, पतीने पत्नीचा खून केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशीच एक नाट्यमय आणि सिनेमाच्या कथेला साजेशी घटना उत्तरप्रदेशमधून समोर आली आहे. पत्नीने नवऱ्याच्या प्रेयसीचा तिच्याच घरी जाऊन तिच्यावर चार गोळ्या झाडून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर ती निडरपणे हातात बंदूक घेऊन परिसरात फिरत होती अशी माहितीही समोर आली आहे.

उत्तरप्रदेशमधील मुरादाबाद मुहम्मद जफर याने शबाना हिच्याशी विवाह केला होता. त्यांना पाच मुले आहेत. शबानाला दीड वर्षांपूर्वी तिच्या नवऱ्याचे एका तरुणीशी अनैतिक संबंध असल्याचे समजले होते. त्यानंतर तिने वारंवार आपल्या पतीला तिच्यापासून दूर राहण्यास आणि संबंध तोडण्यास सांगितले होते. मात्र त्याने तिचे ऐकले नाही. जेव्हा शबानाला आपल्या पतीची प्रेयसी गरोदर असल्याचे समजले तेव्हा तिने तिला मारण्याचे नियोजन केले. काही दिवसांपूर्वी तिच्या नवऱ्याने घरात चोरी झाली होती म्हणून संरक्षणासाठी तिला बंदूक आणून दिली होती. तिने त्याच बंदुकीचा वापर करत त्याच्या प्रेयसीचा खून केला.

शबानाने युट्युब वरून बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. तिने घरी सरावही केला. आणि पतीच्या प्रेयसीच्या घरी जाऊन हे कृत्य केले. सर्वप्रथम तिने तिला घराबाहेर बोलावले. तिच्यावर चार गोळ्या झाडल्या आणि निडरपणे परिसरात फिरत राहिली. स्थानिकांनी पोलिसांना कळवले असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला अटक केले दरम्यान तरुणीला रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. ही तरुणी बिजनौरमधील नूरपूर येथे राहत होती. तिचे लग्नही झाले होते तसेच पतीशी वाद झाल्याने ती वेगळीकडे राहत होती अशी माहिती मिळाली असून या तरुणीला अनेक जण वेगवेगळ्या नावाने ओळखत असल्याची माहिती मिळाली आहे.