Take a fresh look at your lifestyle.

यंदाच्या व्हॅलेंटाईनला तरुणाईसाठी स्पेशल गिफ्ट; ‘लव्ह आज कल’चा रोमँटिक ट्रेलर रिलीज

पिक्चर अभी बाकी है । सैफ आणि दीपिकाचा लव्ह आज कल आठवतोय? दोन वेगळ्या काळातल्या लव्हस्टोरीज एकत्र दाखवून दिग्दर्शक म्हणाला होता कि, “इक्को है कहाणी बस बदले जमाना”. त्याचाच पुढचा भाग सेम नावाने येतोय , खासियत म्हणजे यात दिसणारे सध्याची सर्वांची हॉट फेव्हरेट जोडी, कार्तिक आणि सारा.

‘लव्ह आज कल-२’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीझ झाला आहे. या चित्रपटात सारा अली खान आणि कार्तिक आर्यनची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच युट्यूबवर रिलीझ झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आहे. संवेदनशील रोमॅंटिक कथा पडद्यावर साकारणारा दिग्दर्शक म्हणून ओळख असलेल्या इम्तियाज अलीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

यापूर्वी २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या इम्तियाज अलीच्या ‘लव्ह आज कल’ला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. तेव्हा त्याच्या ‘लव्ह आज कल-२’ या सिक्वल चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. यापूर्वीच्या लव्ह आज कल चित्रपटात दीपिका आणि सैफची जोडी झळकली होती. तर या सिनेमाच्या सिक्वलमध्ये सैफची मुलगी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन याची हॉट केमेस्ट्री पडद्यावर दिसणार आहे. येत्या १४ फेब्रुवारीला म्हणजे ‘वैलेंटाईन डे’ च्या दिवशी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.