Take a fresh look at your lifestyle.

शिरोडकरांची नम्रता झाली ४८ वर्षांची, महेशबाबू सोबतची वाचा तिची झकास लव्हस्टोरी !

फिल्मी दिनविशेष । मराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा आज वाढदिवस. २२ जानेवारी १९७२ रोजी जन्मलेल्या नम्रताने आज आपल्या आयुष्याच्या ४९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आज नम्रताच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर महेशबाबू यांनी ‘माझ्या यशातील पहिली भागीदार असलेल्या माझ्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असा संदेश ट्विटरवर टाकला आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार महेशबाबूसोबत वामसी या चित्रपटात काम करत असताना नम्रता त्याच्या प्रेमात पडली. आपल्यापेक्षा वयाने ४ वर्ष लहान असणाऱ्या महेशबाबूशी आयुष्याची गाठ बांधताना तिने कोणत्याच बाह्यपरिणामांचा विचार केला नाही. पहिल्याच चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होताना त्यांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर ४ वर्षं एकमेकांसोबत प्रेमात राहिल्यानंतर १० फेब्रुवारी २००५ ला दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर नम्रता चित्रपटात फारशी दिसली नाही परंतु महेशबाबुंच्या करियरने मात्र यशाचे शिखर मागील 15 वर्षांत गाठल्याचं पहायला मिळालं.

मॉडेलिंगपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या नम्रताला १९९३ चा मिस इंडिया फेमिना हा किताबही मिळाला होता. मराठी, हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची वेगळीच छाप सोडल्याचं पहायला मिळालं. नम्रताने अस्तित्व, हेराफेरी, वास्तव, वामसी, पुकार, कच्चे धागे, तेरा मेरा साथ रहे, एलओसी कारगील अशा दर्जेदार चित्रपटांत काम केलं आहे.

Comments are closed.