Take a fresh look at your lifestyle.

आता घरबसल्या तुम्हीही होऊ शकता ‘द कपिल शर्मा शो’ चा भाग

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । काही दिवसांपासून कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये मंदीचं वातावरण तयार झाले आहे. सर्वच क्षेत्रांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. बऱ्याच दिवसांनंतर अनेक सर्वांचे आवडते कार्यक्रम आत्ता प्रदर्शित झाले आहेत. महिन्याच्या ब्रेक नंतर आत्ता पुन्हा तुमचा आवडता कार्यक्रम कपिल शर्मा शो सुरू झाला.महत्वाची बाब म्हणजे तुम्ही घर बसल्या तुमच्या आवडत्या कार्यक्रमा मध्ये भाग घेऊ शकतात. या सर्वांचा भाग होण्याचं असले तर सर्व माहिती कपिल ने स्वतः आपल्या व्हिडीओ मधून दिली आहे.

या व्हिडिओ मध्ये सांगितले आहे की, सोशल डिस्टनशनमुळे कपिल शर्मा शोमध्ये नेहमी प्रमाणे ऑडियन्स दिसणार नाही. त्यामुळेच घरी बसलेल्या लोकांना शोचा भाग बनू शकणार आहात.यासाठी फक्त एक काम करायचं आहे त्यासाठी१० ते १५ सेकंद व्हिडीओ तयार करायचा आहे. त्यात तुमचं शहर, नाव, वय, आणि तुम्ही काय करता हे सांगायचं आहे. नंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून कपिल शर्मा ला टॅग करावं लागतं

कपिल शर्मा ची टीम तुमच्याशी संपर्क करेल आणि शोसाठी व्हिडीओ कॉल केला जाईल. तुम्हाला घरबसल्या टीव्हीवर झळकल्याची संधी मिळणार आहे.कोरोना मुळे तीन महिन्यांत शूटिंग बंद होती.आत्ता कपिल शर्मा शो चा प्रोमो समोर आला आहे. ज्यात कपिल, कृष्णा, अभिषेक, भारती ,मस्त करताना दिसत आहे. पण शो चा फॉर्मेट बदलला आहे.

Comments are closed.