Take a fresh look at your lifestyle.

‘या’ अभिनेत्याची पत्नी दुस-यांदा करू इच्छिते लग्न…

0

चंदेरी दुनिया । मिलिंद सोमण या अभिनेत्याला बॉलीवूडमध्ये कलाकार म्हणून फारसे बस्तान बसवता आले नसले तरी प्रसिद्धी फोकस मात्र नेहमीच त्याच्याभोवती राहिला, याचे दोन कारण आहे पहिले कारण म्हणजे मिलिंदची स्टाईल आणि फिटनेस आणि दुसरे म्हणजे रिलेशनशिप स्टेटस.सोशल मीडियावर मिलिंद सोमण नेहमीच आपल्या लाइफमधील अप अँड डाउन बिनधास्त शेअर करत असतो. यातच मिलिंदने एक थ्रोबॅक फोटो शेअर केला.

सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या फोटोला सोशल मीडिया युजर्ससह मिलिंदची बेटरहाफ अंकिताने फोटोवर कंमेंट करत पुन्हा त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा तिने बोलून दाखवली आहे. दरम्यान, मिलिंदने थ्रोबॅक, वय 38 वर्षे, असे त्याने हा फोटो शेअर करताना लिहिले. या फोटोत मिलिंद एकदम इंटेन्स लूकमध्ये दिसतोय. तर ‘आपण पुन्हा लग्न करूयात का? ‘असे मिलिंदच्या या फोटोवर कमेंट करताना अंकिताने लिहिले.

तर अंकिताच्या या कमेंटला मिलिंदनेही लगेच उत्तर दिले. ‘कधीही… कुठेही…’ असे त्याने लिहिले. या कंमेंट्सच्या जुगल बंदीला युजर्सचाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: