Take a fresh look at your lifestyle.

रिया चक्रावर्तीची सुशांतसाठी भावनिक पोस्ट! काय लिहले आहे ते पाहा…

मुंबई । सुशांत सिंग ला जाऊन महिना झाला आहे. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण बॉलिवूड क्षेत्रात खळबळ माजली आहे. त्यामध्ये मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. सुशांतच्या आत्महत्तेअनेक दिग्गजांची चौकशी केली आहे. तसेच सुशांताची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची सुध्दा या प्रकरणी चौकशी करण्यात आली होती. आता रियाने आपला व्हाट्सअप चा डीपी बदलला आहे. रियाने सुशांत सोबतचा फोटो ठेवला आहे.

सुशांत ला जाऊन एक महिना झाला आहे.यादरम्यान रियाने सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट केली नव्हती. रिया ने इन्स्टाग्रामवर सुशांतसाठी पोस्ट केली आहे . त्यामध्ये तिने लिहले आहे की, जगातील तू एकमेव व्यक्ती आहेस, कि ज्याने मला प्रेम आणि विश्वास दिला . प्रेमाची जाणीव करून दिली. ‘मी आताही माझ्या भावनांचा सामना करण्यासाठी संघर्ष करत आहे. तूच मला शिकवलसं की, कसं एखादं सोप समीकरण जीवनाचा अर्थ शिकवू शकतं. मी तुला वचन देते की, मी तुझ्याकडून प्रत्येक नवीन गोष्ट तुझ्याकडून शिकली आहे आज तू माझ्याबरोबर नाहीस याच अतोनात दुःख आहे. मला माहिती आहे की, तू सध्या अत्यंत शांतिपूर्ण जागेवर आहेस. चंद्र, तारे, या सर्वांनी मोकळ्या मनाने एका भौतिकशास्त्र तज्ज्ञाचं म्हणजे तुझं स्वागत केलं असणार. तू स्वतः एक प्रतिभावंत तारा बनला आहेस. मी प्रत्येक दिवशी या तुटणाऱ्या ताऱ्याची वाट पाहणार आहे आणि हे मागणार की, तू माझ्याकडे पुन्हा यावं. तुझ्यासारख एक उच्च व्यक्तीमत्त्व मला लाभलं होत. तू सुंदर व्यक्तिमहत्व असणारा व्यक्ती होतास, ज्याला संपूर्ण जगाने पाहिलं आहे. मी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी असमर्थ आहे आपलं प्रेम वेगळं आहे. तू सारं काही मोकळ्या मनाने करू शकतेस. आणि आता तू हेसुद्धा दाखवून दिलसं की, आपलं प्रेम एक इतरांसाठी उदाहरण आहे. तुला शांती मिळो सुशी, तुला गमावून आज ३० दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु माझा त्यावर विश्वास बसत नाही कि तू माझ्यासोबत नाहीस. मी आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करीन.’

सुशांत सिंह राजपूत हा अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत गेल्या एका वर्षापासून रिलेशनमध्ये होता. या वर्षाअखेरीस ते दोघे लग्न करणार होते. आत्महत्येपूर्वी सुशांतने रियाला फोनही केला होता, परंतु तिने त्याचा कॉल उचलला नव्हता. त्यामुळे सुशांत ने टोकाचे पाऊल उचलले. मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिज्मचा मुद्दा उपस्थित झाला होता. तसेच सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील मोठे स्टार्स आणि प्रोडक्शन कंपन्या जबाबदार असल्याची टीकाही करण्यात येत होती. तसेच रिया चक्रवर्तीने सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडले असा आरोप तिच्यावर होता होता. बिहारमध्ये करण जोहर, एकता कपूरसह अनेक लोकांविरोधात याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत.

Comments are closed.