Take a fresh look at your lifestyle.

Sairat : ‘सैराट’ झालं जी… 6 वर्षांचा नादखुळा प्रवास; लाडक्या आर्चीने दिला आठवणींना उजाळा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Sairat) मराठी प्रेक्षक वर्ग मराठी चित्रपटाकडे ओढून मराठी सिनेसृष्टीला उच्चांकावर नेणाऱ्या चित्रपटांपैकी एक सैराट या चित्रपटाला तब्बल ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. समाजातील न बोलल्या जाणाऱ्या विषयांना हात घालून समाज प्रबोधन करणारे दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांची हि रेकॉर्डब्रेक निर्मिती असून या चित्रपटाचा एक मोठा चाहता वर्ग आहे.

या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीकडे चुंबकाप्रमाणे प्रेक्षक ओढला. शिवाय कमाईचा एक इतिहास रचलाय. अनेक प्रेक्षकांनी हा चित्रपट वारंवार पाहिला आणि इतकीच प्रतिक्रिया दिली कि कमाल.. यानंतर आता ६ वर्ष पूर्ण झाल्यानंतर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने आठवणी शेअर केल्या आहेत. (Sairat)

नागराज मंजुळे यांची ऐतिहासिक कलाकृती म्हणजेच ‘सैराट’. हा चित्रपट २९ एप्रिल २०१६ साली सर्वत्र प्रदर्शित झाला होता. यानंतर शुक्रवारी २९ एप्रिल २०२२ रोजी या चित्रपटाला तब्बल ६ वर्षे पूर्ण झाली. या दिवसाचे औचित्य साधून आपल्या सर्वांची लाडकी आर्ची अर्थात आत्ताची आघाडीची अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने सैराटच्या आठवणींना उजाळा दिला आहे. (Sairat)

तिने इंस्टाग्राम स्टोरीवर काही पोस्ट केल्या आहेत सोबत (Sairat) सैराट’ची ६ वर्ष असं कॅप्शनही दिल आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या नव्या कोऱ्या जोडीनं आर्ची आणि परश्या होऊन अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं होत. यामुळे प्रेक्षकांच्या मनात ती दोघे आजही जिवंत आहेत. ग्रामीण भागातील सरंजामशाही, जातीय तेढ आणि आंतरजातीय विवाहातील संघर्ष अगदी अचूक आणि कोणत्याही धर्माला गाल बोट न लावता मंजुळेंनी मार्मिकपणे हा विषय या चित्रपटाने मांडला आहे.

दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी मराठी चित्रपट विश्वात क्रांती घडवून आणली असे म्हणणे काही चुकीचे ठरेल असे वाटत नाही. कारण एका विशिष्ट धाटणीच्या कथानकासह, ठराविक कलाकारांना घेऊन विशिष्ट समजुतीच्या सिनेमाची चौकट मोडून त्यांनी आतापर्यंत अव्वल दर्जाचे चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. यामध्ये ‘पिस्तुल्या’, ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ आणि आता ‘झुंड’ या चित्रपटांचा आणि इतर अनेक कलाकृतींचा समावेश आहे. (Sairat)

त्यांनी नेहमीच सामान्य पातळीवर राहून काम करणे पसंत केले आहे. पण नागराज यांच्या पाठीवर कौतुकाची थाप हि सैराट चित्रपटानेच मिळवून दिली. कारण सैराटने सर्व रेकॉर्ड मोडून एक नवा रेकॉर्ड बनवला जो मंजुळेंच्या नवे झाला. या चित्रपटाने केवळ राष्ट्रीय पुरस्कार जिंकले नाहीत तर १०० कोटींचा टप्पाही पार केला. दरम्यान १०० कोटी पार करणारा ‘सैराट’ हा पहिला मराठी चित्रपट ठरला. (Sairat)

या चित्रपटाच्या माध्यमातून अजय अतुल या जोडीने संपूर्ण महाराष्ट्राला नादखुळा संगीत प्रदान केले आहे. तर या चित्रपटाने नागराज मंजुळेंसह, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, तानाजी गालगुंडे, अरबाज शेख हे हरहुन्नरी कलाकार सिने सृष्टीला दिले. शिवाय हा चित्रपट जितकं शिकवून गेला तितकं भारावून गेला. साधारण ४ कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने तब्बल ११० कोटी कमाई केली आणि पुन्हा असा सैराट होणे नाही… (Sairat)

 

‘हे’ पण वाचा :-

‘मी येडा आहे.. मी काहीही म्हणेन’; नागराज मंजुळेंकडून माध्यमांची कानउघाडणी

Chandramukhi : प्रेम, राजकारण आणि सौभाग्य.. ऎकाsssssss ; ‘चंद्रमुखी’च्या ट्रेलरची प्रेक्षकांवर फक्कड छाप