Take a fresh look at your lifestyle.

Chandramukhi : प्रेम, राजकारण आणि सौभाग्य.. ऎकाsssssss ; ‘चंद्रमुखी’च्या ट्रेलरची प्रेक्षकांवर फक्कड छाप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Chandramukhi) सहज सुंदर आणि मोहक अदा जिची ती चंद्रा आता तुमच्या समोर येण्यास सज्ज आहे. विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट येत्या २९ एप्रिल २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना मोहून टाकले आहे. यानंतर आता चंद्रमुखीच्या दमदार ट्रेलरने आपली जादू केली आहे. याशिवाय ट्रेलरमध्ये आणखी एका भूमिकेची उकल झाली आहे जी अतिशय धक्कादायक आहे. या चित्रपटाची कथा एकंदरच चंद्राचं प्रेम, दौलतचं राजकारण आणि धक्का देणाऱ्या एंट्रीतून समोर आलेल्या दमयंतीच्या सौभाग्य रेखेवर आधारलेली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर इतका मोहक आहे कि बस्स्स…

चंद्राचे सौंदर्य, अदा, गोड गळा आणि तालमय नृत्याने खासदार दौलतराव देशमाने भुलले पण.. चित्रपटाचा ट्रेलर सांगतो कि हि वाट वेगळ्या वळणाची आहे. कारण यातून एका स्त्रीच्या सौभाग्याला धक्का लागतोय आणि ती म्हणजे सौभाग्यवती दमयंती दौलतराव देशमाने. होय. या प्रेमकहाणीतील हा ट्विस्ट अतिशय हादरा देणारा ठरला आहे. दमयंती हि भूमिका अभिनेत्री मृण्मयी देशपांडे साकारत असून चंद्रा आणि दौलतराव यांच्या हळुवार खुलणाऱ्या प्रेमकहाणीत तिची एंट्री एक अनोखा ट्विस्ट निर्माण करतेय. तो ध्येयधुरंदर राजकारणी विवाहित असल्याने त्याचे तमाशा गाजवणाऱ्या सौंदर्यवतीच्या म्हणजेच ‘चंद्रा’च्या प्रेमात पडणे समाजाला मान्य नाही. त्यामुळे त्याच्या राजकीय कारकिर्दीवर होणारा परिणाम, वैयक्तिक आयुष्यात येणारी वादळे आणि प्रेमापासून होणारी ताटातूट या ट्रेलरमध्ये दाखवली आहे. या ट्रेलरमधून चंद्रा – दौलतराव – दमयंती यांच्या प्रेमाचा हा ट्रायो प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढवतोय. (Chandramukhi)

दरम्यान (Chandramukhi) चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाला कि, “ही कथा अतिशय ताकदीची आहे. ज्यावेळी हा चित्रपट मी करण्याचे ठरवले तेव्हा माझ्या डोक्यात या व्यक्तिरेखा कोण साकारणार हे पक्के होते. त्यामुळे प्रत्येक पात्र आपापल्या भूमिकेत चपखल बसले. यातील प्रत्येक गोष्ट खूप विचार करून केली आहे. यामुळे त्याची भव्यता प्रेक्षकांना पडद्यावर दिसेल. चित्रपटातील दमयंती ही व्यक्तिरेखा इतक्या दिवसांनी प्रेक्षकांसमोर आणल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

अमृता, मृण्मयी आणि आदिनाथबद्दल मला आवर्जून सांगावेसे वाटते. अमृताने ही भूमिका साकारण्यासाठी वजन वाढवले आणि तेच वजन चित्रपटाकरता कायम ठेवण्यासाठीही तिने खूप मेहनत घेतली आहे. भाषेवर अभ्यास केला. शिवाय अनेक काळ ती सोशल मीडियापासूनही लांब राहिली. तर आदिनाथनेही त्याची देहबोली, ध्येयधुरंदर, रुबाबदार दिसण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. मृण्मयीची भूमिकाही खूप महत्वपूर्ण आहे.” (Chandramukhi)

याशिवाय मृण्मयी देशपांडे आपल्या दमयंती या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाली कि, ”यात मी खा. दौलतराव देशमाने यांच्या पत्नीची भूमिका साकारतेय. डॉली म्हणजेच दमयंती दौलतराव देशमाने. जिचा दौलतरावांची कारकीर्द घडवण्यात मोठा सहभाग आहे. ट्रेलरपर्यंत आम्हाला ही व्यक्तिरेखा समोर येऊ द्यायचीच नव्हती. कारण कथानकात पुढे काय गोष्ट बदलते, यावर पडदा ठेवायचा होता. एक एक व्यक्तिरेखा समोर आल्याने त्या प्रेक्षकांच्या डोक्यात बसत होत्या आणि अचानक माझी व्यक्तिरेखा समोर आल्यावर सगळी समीकरणे बदलली. मात्र चित्रपटात उलट आहे. (Chandramukhi) ‘चंद्रमुखी’च्या येण्याने सगळी समीकरणे बदलतात. आम्ही प्रमोशन थोडं वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलाय. यात मला आवर्जून सांगावे वाटते, याची पटकथा चिन्मयने लिहिली आहे आणि आतापर्यंतची चिन्मयची ही सर्वोत्तम कलाकृती आहे. ही कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची खुबी प्रसादकडे आहे. त्यानेही उत्तमरित्या ही कथा समोर आणली आहे.”

‘हे’ पण वाचा :-

चंद्रमुखीतील बाई गं गाण्याविषयी व्यक्त झाली चंद्रा; म्हणाली, हे गाणं फक्त गाणं नसून..

चंद्रासोबत थिरकली मंजिरी; व्हिडीओ पोस्ट करीत केले अभिनेत्रीचे कौतुक

मी आणखी चांगली ‘चंद्रमुखी’ साकारली असती; मानसी नाईकचे विधान चर्चेत