सोशल कट्टा । सोशल मिडीयावर सना खान नुकत्याच झालेल्या ब्रेकअपमुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. गेली तीन वर्ष ती नृत्यदिग्दर्शक मेलव्हिन लुईसला डेट करत होती. मात्र त्याने तिचा विश्वासघात केला, त्याचे अनेक मुलींशी संबंध होते, असा आरोप सनाने केला. या आरोपांवर आता लुईसने तिला प्रत्युत्तर दिले आहे.
मेलव्हिन लुईसने सना आणि त्याच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. यापूर्वी मेलव्हिनने तिच्यावर केलेले आरोप तिने या क्लिपमध्ये मान्य केले आहेत. तसेच ब्रेकअपचे प्रकरण केवळ प्रसिद्धीसाठी लावून धरले होते. हे देखील सनाने मान्य केले आहे. ही ऑडिओ क्लिप फोनवर झालेल्या त्यांच्यातील खासगी संभाषणाची आहे. “तू माझ्या कुटुंबाची खिल्ली उडवलीस. तू माझ्यावर वर्णभेदी टिप्पणी केलीस. तू माझ्यावर खोटे आरोप केलेस. मला खात्री आहे की, आता तुला प्रसिद्धी मिळवून खूप आनंद मिळाला असेल.” अशा आशयाची कॉमेंट लिहिली आहे.
या आधी सना खान ने लुईस वर खुलेआम फसवल्याचा आरोप केला होता. ती म्हणाली होती, “खरं तर पहिल्यांदाच मी आमच्या नात्याविषयी इतक्या मोकळेपणाने बोलत आहे. खरं बोलायला खूप हिंमत लागते. जवळपास वर्षभरापूर्वी त्याचा खरा चेहरा माझ्या समोर आला. माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये असतानाच त्याचे इतर अनेक मुलींशी संबंध होते. माझं दुर्दैव हे की मी त्याच्यावर डोळे झाकून प्रेम केलं.”
https://www.instagram.com/p/B9ZeBDGl_-Z/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
https://www.instagram.com/p/B8dL_GXg-tB/
Comments are closed.