Take a fresh look at your lifestyle.

‘सविता भाभी’ वादात; अश्लील उद्योग मित्र मंडळाला नोटीस !

मराठी सृष्टी । अश्लील उद्योग मित्र मंडळ चा प्रोमो काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. त्यात काही दिवसापूर्वी पुण्यात सविता भाभीची चांगलीच चर्चा रंगली होती. अश्लील उद्योग मित्र मंडळ या चित्रपटाने हटके पद्धत वापरत चित्रपटाचं प्रमोशन केलं होतं. मात्र आता या चित्रपटातील सविता भाभी या कॉमिक कॅरेक्टरवरुन वाद निर्माण झाला आहे. निलेश गुप्ता यांनी हे पात्र कॉमिक कॉपीराइट असताना त्याबद्दल परवानगी न घेता वापरल्याप्रकरणी चित्रपटाला कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

   अभिनेत्री सई ताम्हणकर ही आलोक राजवाडे दिग्दर्शित अश्लील उद्योग मित्र मंडळ या चित्रपटामध्ये सविता भाभीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी चित्रपटाच्या टीमने पुण्यात सविता भाभी… तू इथंच थांब!! असे होर्डिंग्ज लावले होते. या होर्डिग्सची चांगली चर्चाही रंगली होती मात्र याच दरम्यान, निलेश गुप्ता यांनी कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

   कायदेशीर नोटीस मध्ये चित्रपटातील पात्र हे कॉमिक कॉपीराइट असताना त्याबद्दल कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही असं म्हणन्यात आले आहे. आता या चित्रपटासमोर नवीन अडचण उभी राहिली आहे. येत्या ६ मार्च रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात सईसोबत अभिनेता अमेय वाघ मुख्य भूमिकेत झळकणार आहे. बघू आता निर्माते चित्रपटात काय बदल करतात. सविता भाभीची ‘कविता भाभी’ करू नयेत म्हणजे झालं